top of page

केरळममध्ये पेट्रोल डिझेल खरेदीवर मर्यादा? राज्यातील पंपांना आदेश

मध्यंतरी अचानक देशात पेट्रोल- डिझेल, व्यवसायिक- घरगुती एलपीजी, सीनजीचा मोठा तुटवडा झाला होता. ग्राहकांच्या प्रत्येक ठिकाणी लांबच लांब रांगा लागल्या होत्या त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. पण नंतर पुरवठा सुरळीत झाला. तर आता ही केंद्र सरकार दोन महिने पुरेल इतका इंधन साठा देशात असल्याचा दावा करत आहे. पण या राज्यातून मोठी बातमी समोर येत आहे. या राज्यातील काही वृत्तानुसार इथे पेट्रोल आणि डिझेलचे रेशनिंग सुरू झाले आहे. आता नियमानुसार ग्राहकांना इंधन खरेदी करता येणार आहे.


केरळम राज्यात पेट्रोल आणि डिझेल खरेदीविषयी नवीन नियम लागू करण्यात आल्याच्या बातम्या समोर येत आहे. ने याविषयीचे वृत्त दिले आहे. केरळम राज्यात आता घाऊक विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. ग्राहकांना जास्तीत जास्त 200 लिटर डिझेल खरेदी करता येईल. तर एका व्यक्तीला 5,000 रुपयांपर्यंत पेट्रोल खरेदी करता येईल. तुटवडा होऊ नये आणि अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. इथल्या पंपांना काही दिवसांसाठी पेट्रोल आणि डिझेलचा एक निश्चित साठा मिळत असल्याचे समोर येत आहे. पुरवठा सुरळीत राहावा आणि तो खंडित होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.


इंधनासाठी पेट्रोल पंप चालकांना आगाऊ रक्कम मोजावी लागत आहे. तर क्रेडिट बेस्ट सिस्टिम बंद करण्यात आली आहे. केरळमध्ये जवळपास 2,500 पेट्रोल पंप आहेत. त्यातील 12,000 ते 24000 लिटरपर्यंतचे पंप नियमीत इंधन टँकरवर अवलंबून आहेत. शहरातील पेट्रोल पंपावर रोज 10,000 लिटर डिझेलची विक्री होते. तर गावाकडील पंपावरही डिझेलची अधिक विक्री होते. अधिकची मागणी थोपवण्यासाठी हे पाऊल करण्यात आल्याचे समजते.


इंधन वितरकांनी एक बाब स्पष्ट केली आहे की, इंधन तुटवडा झालेला नाही. तर अतिरिक्त खरेदीला लगाम लावण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीचे आवाहन केल्यानंतर असे नियम लागू करण्यात आले हे विशेष. केरळम स्टेट पेट्रोलियम ट्रेडर्स असोसिएशनच्या प्रतिनिधींनी राज्यात इंधन तुटवड्याचा दावा खोडून काढला. राज्यात इंधनाचा मुबलक साठा आहे. पण काही लोक नाहक पेट्रोल- डिझेलचा साठा करून ठेवत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे समोर येत आहे.

Comments


bottom of page