top of page

कोणतेही अधिकचे निकष न ठेवता पूरग्रस्तासह शेतकर्‍यांना मदत- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री शेतकर्‍यांच्या बांधावर, सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांचा पाहाणी दौरा


ree

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस आणि पूरस्थितीमुळे राज्यातील बहुतांश भागात पिकांसह मालमत्तेचं प्रचंड नुकसान झालं आहे. सोलापूर जिल्ह्यातील बहूतांश भागालाही पुराचा मोठा फटका बसला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माढ्यातील निमगांव, दारफळ येथे पूरग्रस्त भागाची पाहाणी केली. त्यानंतर पुरग्रस्तांच्या मदतीबाबत मुख्यमंत्र्यांनी मोठं विधान केलं आहे. कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकर्‍यांना मदत करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.


पुरग्रस्त भागाची पाहाणी केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी फडणवीस म्हणाले की, मदत करताना सरकार कुठेही आखडता हात घेणार नाही. संकटात सरकार पाठीशी आहे. एकमेकांना धीर द्या, मदत सर्वांना मिळेल. सरकार कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकर्‍यांना मदत करणार आवश्यकतेनुसार निकष शिथिल करून शेतकरी आणि नागरिकांना मदत केली जाईल, अशी घोषणाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली.


शिवाय व्यावसाकिय, फळबाग, नुकसानग्रस्त सरकारी कार्यालयांनाही मदत केली जाईल. जसेच पुराचा फटका बसलेल्या वस्त्या आणि शाळांनाही मदत केली जाईल आणि तातडीची मतद लवकरच दिली जाईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.


माढ्यात शेतकर्‍याने मुख्यमंत्र्यांची गाडी आडवली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माढा तालुक्यातील निमगाव आणि दारफळ या पूरग्रस्त गावांची पाहणी करून परतत होते यावेळी ही घटना घडली. दरम्यान, सीना दीला आलेल्या महापूरामुळे या भागात शेकडो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेली आहे. यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. आपली व्यथा आणि नुकसान झालेले पाहून निराश झालेल्या एका शेतकर्‍याने मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी अचानक त्यांची गाडी अडवली. हा शेतकरी धावत मुख्यमंत्र्यांच्या गाडीजवळ गेला. यानंतर त्याने हातवारे करत मुख्यमंत्र्यांपुढे व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र तिथे असलेले सुरक्षारक्षकांनी वेळीच त्याला बाजूला केले आणि नंतर मुख्यमंत्र्यांची गाडी पुढे गेली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Comments


bottom of page