गोवा हादरले : मध्यरात्री नाईटक्लबमध्ये स्फोट, 23 जणांचा मृत्यू
- Navnath Yewale
- 12 minutes ago
- 1 min read
सिलेंटरचा स्फोट, नाईटक्लबला आग, मृतांमध्ये 4 पर्यटकांचा समावे

गोवा: मध्यरात्री गोव्यात मोठी दुर्घटना घडली आहे. शनिवारी रात्री उशिरा उत्तर गोव्यातील एका नाईटक्लबमध्ये सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटानंतर काही वेळातच संपूर्ण नाईट क्लक जळून खाक झाला. त्यात एकून 23 जणांचा मृत्यू झाला आहे. आगीचे कारण सिलेंडरचा स्फोट असल्याचे पोलिसांनी निश्चित केलं आहे.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्वत:देखील मृतांच्या संख्येची पुष्टी केली. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले की, मृतांमध्ये बहुतेक किचनमधील कामगार होते, ज्यात महिलांचा समावेश आहे. त्यांनी पुढे सांगितलं की, मृतांमध्ये तीन ते चार पर्यटकांचाही समावेश आहे.
आगीची माहिती मिळताच, मुख्यमंत्री प्रमोद सावंत घटनास्थळी पोहोचले. मुख्यमंत्री सावंत पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, 23 जणांपैकी तीन जण भाजल्याने आणि उर्वरित लोक गुदमरल्याने मृत्यूमुखी पडले. प्राथमिक माहितीवरून असे दिसून येते की नाईटक्लबने अग्निसुरक्षा नियमांचे पालन केलं नव्हतं. सावंत म्हणाले की, क्लब व्यवस्थापन आणि सुरक्षा नियमांचे उल्लंघन करूनही क्लबला काम करण्यास परवानगी देणार्या अधिकार्यांवर कारवाई केली जाईल.
नाईटक्लबमध्ये मध्यरात्री 12:00 वाजता सिलेंडरचा स्फोट झाला. आगीमुळे क्लबमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आणि लोक इकडे तिकडे पळू लागले. बचाव कार्याची टीम घटनास्थळावर पोहोचली मात्र, आग आटोक्यात आणेपर्यंत 23 जणांचा मृत्यू झाला. काही जण भाजल्याने मरण पावले, तर काही जण गुदमरल्याने मरण पावले. मध्यरात्रीनंतर रोमिया लेनजवळील बर्च येथे ही आग लागली. हे ठिकाण नाईट क्लब आणि पार्टीसाठी लोकप्रिय आहे.
मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, “ पर्यटनाच्या हंगामातील ही एक दु:खद घटना आहे. आम्ही या घटनेची सविस्तर चौकशी करू आणि दोषींवर कठोर कारवाई करू” दरम्यान, गोवा पोलिस प्रमुख आलोक कुमार यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, आग सिलेंडरच्या स्फोटामुळे लागली आहे. दरम्यान, स्थानिक भाजप आमदार मायकल लोबो म्हणाले, “सर्व 23 मृतदेह घटनास्थळावरून बाहेर काढण्यात आले आहेत आणि बांबोलीम येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले आहे.”



Comments