(घटनेचा सीसीटीव्ही Video )श्री क्षेत्र जालिंदरनाथ संस्थान मंदिरातील दान पेट्या चोरट्यांनी पळवल्या
- Navnath Yewale
- 6 days ago
- 2 min read
मास्क लावून आलेले अज्ञात चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद, 50 लाखांवर मुद्देमाल चोरील गेल्याचा संस्थान समितीचा दावा

बीड: नवनाथांपैकी एक जालिंदरनाथ संजीवन समाधीस्थळ असलेल्या बीड जिल्ह्यातील जालिंदरनाथ संस्थान येवलवाडी (ता. शिरुर कासार) येथील मंदिरातील दान पेटी चोरट्यांनी पळवल्याची धक्कादायक घटना गुरूवारी मध्यरात्री 1:30 च्या सुमारास घडली. देवस्थानातील दानपेट्यांवर हात साफ करणार्या चोरट्यांचा संपूर्ण कारनामा येथील सीसीटीव्ही कॅमेर्यात स्पष्टपणे कैद झाला आहे. श्री क्षेत्र येवलवाडी संस्थानच्या दानपेट्या चोरट्यांनी पळवून त्यातील रुपयांसह मौल्यवान सोने,चांदीवर हात साफ करत जवळच एका शेतात फेकल्याचे समोर आले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, मंदिर परिसरात अंधराचा फायदा घेत तीन चोरटे शांतपणे आत मंदिराच्या गाभार्या शिरले. आधी परिसराची पाहणी करून त्यांनी दानपेट्या तोडल्या आणि काही सेकंदातच संपूर्ण ऐवज घेऊन पसार झाले. कॅमेर्यात दिसणार्या फुटेजमध्ये तीनही चोरटे चेहर्यावर कपडा बांधून हलचाल करताना दिसत असल्याने त्यांची ओळख पटवणे आव्हानात्मक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मंदिरात दिर्घकाळ भक्तांकडून जमा होत असलेली रक्कम, काही सोन्याचांदीची दागिने, तसेच पूजा साहित्य स्वरुपात मिळालेल्या वस्तू मिळून दोन्ही पेट्यांमध्ये तब्बल 50 लाखांच्या आसपाचा ऐवज असावा, असा प्रथमिक अंदाज देवस्थान समितीने व्यक्त केला आहे. त्यामुळे चोरीची रक्कम मोठ्या प्रमाणात असण्याची भीती अधिकच वाढली आहे.
दरम्यान, सकाळी मंदीर उघडण्यासाठी आलेल्या पुजार्यांना प्रथम घटनेची माहिती मिळाली. त्यांनी तत्काळ गावकर्यांना बोलावले आणि सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. व्हिडिओमध्ये चोरीचे संपूर्ण चित्रण दिसताच गावकर्यांनी तात्काळ पाटोदा पोलिस ठाण्याशी संपर्क साधला. माहिती मिळताच पोलिस पथक घटनास्थळावर दाखल झाले आणि पंचना करून तपास सुरू केला. परिसरतील इतर सीसीटीव्ही फुटेज, संशयितांचा हालचालींचा मागोवा तसेच मोबाईल लोकेशन आदींच्या आधारे पोलिस तपासाची दिशा निश्चित करतील, अशी भक्तांना आशा आहे.
मंदिरात वारंवार चोरीच्या घटना होत असल्याने स्थानिकांमध्ये संतापाची व्यक्त होत आहे. देवस्थान सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गावकर्यांनी पोलिसांनी तातडीने आरोपींना टक करून चोरी गेलेला ऐवज परत मिळवावा, अशी मागणी केली आहे. तसेच मंदिर व परिसरात सुरक्षेसाठी अधिक सक्षम यंत्रणा उभारण्याची गर असल्याचेही मत व्यक्त केले जात आहे.
या चोरीमुळे केवळ देवस्थानालाच नव्हे तर संपूर्ण परिसरातील भक्तांचीही मन:शांती भंग झाली आहे. श्रद्धेच्या ठिकाणी अशी सततची चोरी होत असल्याने देवस्थान प्रशासन आणि पोलिस यंत्रणेवर अधिक काटेकोर दक्षता घेण्याची वेळ आली आहे.
किमान देवाला तरी सोडा? : श्री. क्षेत्र येवलवाडी संस्थान जालिंदरनाथ याची संजीवन समाधी क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. संस्थानचा देशभरात भक्तगण आहे त्यातच मंदिरातील दान पेट्यां चोरटे पळवत असतील तर चोरट्यांनी किमान देवाला तरी सोडवं अशा भावना भक्तगणातून व्यक्त होत आहेत.



Comments