top of page

जगातल्या दोन सुपरपावरमध्ये डील; ट्रम्प- जिनपींगच्या भेटीने जगातील पाच देशाची झोप उडाली!

May 14
1 min read

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या चीन दौर्‍यावर आहेत. त्यांच्या या दौर्‍यामुळे जगाजील पाच देश टेन्शनमध्ये आले आहेत. मोदी-जिनपींग यांच्या तकाही करार झाले, तर दक्षिण आशियातील समिकरणं बदलू शकतात. वरती नमूद केलेल्या पाच देशांना चीनपासून धोका आहे. म्हणून ते अमेरिकेच्या बाजूने आहेत.


पेंटागानच्या रिपोर्टमुळे तैवान टेन्शनमध्ये आह. चीन 2027 मध्ये तैवानवर हल्ला करेल असं पेंटागनच मत आहे. चीन तैवानला आपला भाग मानतो. आतापर्यंत स्वातंत्र्य अमेरिकेमुळे कायम आहे. अमेरिका आणि चिनमध्ये काही करार झाला, तर त्याचा थेट परिणाम तैवानवर होईल. फिलिपींस हा दक्षिण चीन समुद्रात चीनचा शेजारी आहे. इथे असलेल्या अनेक बेटांवरुन चीन आणि फिलिपींसमध्ये वाद आहे. फिलिपींसला अमेरिकेेकडून शस्त्र आणि गोपनीय माहिती मिळते. अमेरिकेच्या कुठल्याही निर्णयाचा फिलिपींसवर परिणाम होऊ शकतो. जपान आणि चीन जुने प्रतिस्पर्धी आहेत. दोन्ही देशांमध्ये 1950 च्या सुमारास युद्ध सुद्धा झालं होतं. जपान दक्षिण चीन समुद्रात चीनचा मोठा विरोधक आहे. साऊथ चायना समुद्र मार्गे जगातील 25 टक्के व्यापार होतो. जपानची सुरक्षा अमेरिकेवर आवलंबून आहे. अशावेळी चीन सोबत ट्रम्प यांचा करार टोक्योवरही परिणाम करेल.


दक्षिण कोरियावर सध्या उत्तर कोरिया आणि चीन दोघांचा दबाव आहे. दक्षिण कोरियाचं संरक्षण धोरण 1950 पासून अमेरिकेवर अवलंबून आहे. ट्रम्प हॉर्मुजवरुन दक्षिण कोरियावर नाराज आहेत. शस्त्रास्त्रांवरुन ट्रम्प आणि जिनपींग यांच्यात काही करार झाल्यास दक्षिण कोरियावर सुद्धा परिणाम होईल. इंडो-पॅसिफिक रीजनमध्ये ऑस्ट्रेलिया सुद्धा चीनचा कट्टर विरोधक आहे. त्यांना सुद्धा अमेरिका- चीनमध्ये कुठल्या मोठ्या डीलची भीती सतावत आहे.

Comments


bottom of page