top of page

जम्मूचा डॉक्टर बनला ‘जैश’ चा दहशतवादी, पोलिसांना दिलेल्या टिपमुळे हाती लागलं 300 किलो आरडीएक्स

ree

श्रीनगर: जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी एका मोठ्या कारवाईत, अटक केलेल्या एका डॉक्टरच्या माहितीवरून 300 किलो आरडीएक्स, दोन एके-47 रायफल्स आणि मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त केला आहे. या कारवाईमुळे दहशतवाद्यांच्या मोठ्या कटाचा पर्दाफाश झाला आहे.


डॉ. आदिल अहमद राथर असे अटक केलेल्या डॉक्टरचे नांव असून तो अनंतनाग येथील शासकिय वैद्यकिय महाविद्यालयामध्ये औषध विशेषज्ञ होता. डॉ. राथर याने बंदी घालण्यात आलेल्या जैश-ए- मोहम्मद या दहशवादी संंघटनेचे प्रचाराचे पोस्टर लावल्याप्रकरणी सहारनपूर येथून श्रीनगर पोलिसांनी अटक केली होती.


सध्या डॉ. आदिल जम्मे-काश्मीर पोलिसांच्या ताब्यात असून त्याची चौकशी सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. आदिल राथरची चोैकशी केली असता अनेक महत्वपूर्ण गोष्टी उघड झाल्या आहेत. दहशतवादी संघटनेशी संबंधित तीन डॉक्टर होते. त्यातील दोघांना अटक करण्यात आली, मात तिसरा डॉक्टर असूनही फरार आहे.


तपासादरम्यान, डॉ. राथरने दिलेल्या महत्वपूर्ण महितीच्या आधारे पोलिसांनी हरियाणातील फरीदाबाद येथे छापा टाकला. या छाप्यात 300 किलो आरडीएक्स, एक एके -47 रायफल आणि दारूगोळा जप्त करण्यात आला. डॉ. राथर हा अनंतनाग जिल्ह्यातील काझीगुंड येथील रहीवासी आहे.


यापूर्वी, जॉइंट इंटरोगेशन सेंटर अनंतनागरच्या गुप्तचर माहितीनुसार, अधिकार्‍यांनी जीएमसी अनंतनाग येथील डॉ. राथर यांच्या वैयक्तिक लॉकरची तपासणी केली होती. त्यावेळी, लॉकरमधून आणखी एक एके - 47 असॉल्ट रायफल आणि दारुगोळा जप्त करण्यात आला होता.


पोलिस आता ही शस्त्रे आणि प्रचंड स्फोटांचा साठा कोठून आला, डॉक्टर ते कशासाठी बाळगत होते आणि त्यांचे अन्य दहशवादी कारवायांशी काही संबंध आहेत का, या दिशेने तपास करत आहेत. दहतवादी संघटनेसाठी काम करणार्‍या एका उच्चशिक्षित डॉक्टरचा सहभाग उघड झाल्याने सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे.

Comments


bottom of page