जरांगे पाटलांच्या मागण्यांना सकारत्मकपणे पाहतो पण..- मुख्यमंत्री फडणवीस
- Navnath Yewale
- 2 days ago
- 1 min read

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईत आझाद मैदानामध्ये उपोषण सुरू आहे. मराठा समाजास ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी ते शुक्रवारपासून उपोषणास बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. मराठा आणि कुणबी एक आहेत आणियाची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मनेाज जरांगे यांची मुख्य मागणी आहे. या संदर्भात बोलताना “ मनोज जरांगे पाटील ज्या काही मागण्यात करत आहेत. त्याकडे आम्ही सकारात्मपणेच बघत आहोत. कुठेही नकारात्मकता नाही. पण कुठलीही मागणी मान्य करायची, तर ती कायद्याच्या चौकटीत बसायला हवी, ” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “ आता सरसकट ओबीसीमध्ये समावेश वैगेरे, अशा ज्या काही गोष्टी आहेत, त्यामुळे आपल्याकडे सामाजिक बांधिलकीचाही प्रश्न आहे. कारण न्यायालयाचे काही निर्णय आले आहेत, त्या निर्णयांचाही आपल्याला अवमान करता येणार नाही. यामुळे मला असे वाटते की, कायद्याच्या चौकटीत जे काही बसते ते निर्णय घेण्यासाठी सरकार तयार आहे”
दम्यान, “ कायद्याच्या चौकटीच्या बाहर जाऊन असाच निर्णय करा, असं कुणी म्हटलं तरी, सरकारने खूश करण्यासाठी असा निर्णय घेतला, तरी तो एक दिवसही टिकणार नाही. मग त्यात मराठा समाजाची फसवणूक झाल्याची भावना निर्माण होईल. यामुळे आम्ही चर्चा करत आहोत.” एवढेच नाही तर, “आमच्या विखे पाटलांच्या नेतृत्वात उप समितीत चर्चा सुरू आहे. एजींसोबत चर्चा सुरू आहे. कायदेशीर सल्लागारांसोबत चर्चा सुरू आहे. जे काही न्यायालयाचे निर्णय आहेत. त्याचीही पडताळणी सुरू आहे. त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू, ” असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
Comments