top of page

झेडपीलाही महायुतीचा बिनविरोध पॅटर्न जोमात: जिल्हा परिषदेत 5 आणि पंचायत समितीत 6 उमेदवार बिनविरोध

सिंधुदूर्ग: महापालिका निवडणुकानंतर आता जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही भाजप महायुतीचा बिनविरोध पॅटर्न पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप महायुतीचे तब्बल 11 उमेदवार बिनविरोध झाले आहेत.


त्यामध्ये भाजपचे 10 आणि शिंदेंच्या शिवसेनेचा 1 उमेदवार बिनविरोध आहे. जिल्हा परिषद गटातून 5 उमेदवार बिनविरोध असून उमेदवार पंचायत समिती गणातून बिनविरोध आहेत. त्यामुळे महायुतीने महापालिकेप्रमाणे जिल्हा परिषदेतही बिनविरोध पॅटर्न कायम ठेवल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे सिंधुर्दु हा भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचाच मूळ जिल्हा आहे.


जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज प्रक्रिया संपुष्टात येत असून अर्ज छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता 27 जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्यामुळे, अपक्ष उमेदवारांकडून अर्ज मागे घेतले जात असून काही विरोधी पक्षातील उमेदवारही नांग्या टाकत आहेत. त्यामध्ये, सिंधुदूर्ग जिल्हा परिषदेत 5 आणि पंचायत समितीती एकूण 6 उमेदवार बिनविरोध झाले आहेत. त्यामध्ये, जिल्हा परिषद गटात भाजपचे 4 आणि शिंदेंच्या शिवसेनेचा एक उमेदवार बिनविरोध आहे. तर, पंचायत समितीमध्ये 6 ही उमेदवार भाजपचे आहेत.


खासदार नाराण राणे यांच्या आणि मंत्री नितेश राणे यांच्या प्रत्यक्ष व्यूहरचनेमुळे जिल्ह्यातील अनेक जागांवर विरोधकांनी आपली उमेदवारी मागे घेतली. विशेष: कणकवली मतदारसंघात राणे यांचा मोठा प्रीाव पाहायला मिळत आहे. अर्ज मागे घण्याची शेवटची मुदत 27 जानेवारी असल्याने शेवटच्या टप्प्यात पालकमंत्री विरोधकांना आणखीन काही धक्के देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा विजय म्हणजे जनतेचा राणे कुटुंबीयांवरील विश्वास आणि महायुमतीच्या कामाची पावती आहे. उरलेल्या 45 जागांवरही आमचा करिष्मा कायम राहील, अशा भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.


सिंधुर्दू जिल्हा परिषदेमध्ये महायुतीचे बिनविरोध झालेले उमेदवार खारेपाटण जिल्हापरिषद गट उमेदवार प्राची इस्वलकर (भाजप), जानवली जिल्हापरिषद गट रुहिता राजेश तांबे (शिवसेना शिंदे गट), पडेल जिल्हा परिषद (देवगड) गट सुयोगी रवींद्र घाडी (भाजप), बापर्डे जिल्हा परिषद (देवगड) गट अवनी अमोल तेली (भाजप), बांदा जिल्हा परिषद गट प्रमोद कामत (भाजप)

कणकवली पंचायत समितीमध्ये महायुतीचे बिनविरोध आलेल्या उमेदवारांमध्ये


बिवडी पंचायत समिती गण संजना संतोष राणे (भाजप), वरवडे पंचायत समितीगण राजेश (सोनू) सावंत (भाजप) तर देवगड पंचायत समिती गणातील बिनविरोध आलेल्या सदस्यांमध्ये पडेल पंचायत समिती गण अंकुश यशंवंत ठूकरुल (भाजप), नाडण पंचायत समितीगण गणेश सदाशिव राणे (भाजप), बापर्डे पंचायत समितीगण संजना संजय लाड (भाजप) यांचा समावेश आहे.

वैभववाडी पंचायत समितीमधून भाजपचे कोकिसरे पंचायत समिती गणातून साधना सुधीर नकाशे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

Comments


bottom of page