top of page

ट्रम्प यांच्या थेट धमकीने जग हादरलं; शोधून -शोधून मारू, आता फक्त 48 तासांचा वेळ

ree

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आता चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी हमासला थेट अल्टिमेटम दिला आहे. शोधून शोधून मारण्याची थेट धमकीच ट्रम्प यांनी दिली आहे. इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढकार घेतला आहे. या दोघांमध्येही समेट घडवून आणण्यासाठी ट्रम्प यांनी एक शांती करार समोर आणला आहे. दरम्यान, इस्त्रायलने शांती करारावर सहमी दर्शवली आहे. सोबतच अनेक मुस्लीम राष्ट्रांनीही या शांतता करारावर कोणताही आक्षेप नोंदवलेला नाही. असे असताना आता हमास या संघटनेच्या सहमतीसाठी ट्रम्प यांनी थेट अल्टिमेटम दिला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला 48 तासांचे अल्टिमेटम दिले आहे. या काळात शांतता कराराला नाकारल्यास त्याचे कठोर परिणाम भोगावे लागतील, अशी थेट धमकीच ट्रम्प यांनी दिली आहे. 7 ऑक्टोबर रोजी महिला आणि लहान मुलांना ठार करण्यात आलं. या हल्ल्याला उत्तर म्हणून इस्तायलने 25 हजारपेक्षा जास्त हमासच्या दशहतवाद्यांना ठार केले. उर्वरित दहशतवाद्यांना इस्त्रायलच्या सैन्याने घेरले आहे, असे ट्रम्प म्हणाले.


तसेच इस्त्रायल फक्त माझ्या होकारासाठी थांबलेला आहे. उर्वरित हमासचे दहशतवादी कुठे लपलेले आहेत, ते इस्त्रायलला माहिती आहे. माझ्या एका इशार्‍यावर या सर्वांनाच इस्त्रायल शोधून शोधून मारून टाकेन असा इशाराच ट्रम्प यांनी दिला आहे. त्यामुळे आता नेमके काय होणार? हमास शांतता करारावर सहमती दाखवणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


Comments


bottom of page