top of page

ट्रम्प यांच्या दौर्‍यापूर्वीच चीनचा अमेरिकेला झटकाथेट उघड उघड धमकी, तरीही ट्रम्प जिनपिंग यांना भेटणार

May 13
2 min read

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे दोन दिवसांच्या दौर्‍यासाठी चीनला रवाना झाले आहेत. ही भेट जरी दोन नेत्यांमध्ये असली तरी या भेटीला महत्वं आहे. त्यामुळे संपूर्ण जगाचं लक्ष या भेटीकडे लागलं आहे. सध्या अमेरिका आणि इराणमध्ये मोठा संघर्ष सुरू आहे. त्यामुळे संपूर्ण जगाचं लक्ष या भेटीकडे लागलं आहे. इराण चीनचा मित्र आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेसोबतच्या युद्धात चीनने इराणची मदत केली असे आरोप देखील झाले होते. तसेच अमेरिकेनं सुरू केलेल्या टॅरिफ वॉरमुळे चीन आणि अमेरिकेमधील संबंध बिघडल्याचं देखील समोर आलं. या सर्व पार्श्वभूमीवर आता चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट महत्वाची मानली जात आहे.


मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीपूर्वीच चीनने अमेरिकेला मोठा झटका दिला आहे. चीनकडून अमेरिकेला थेट उघड उघड धमकी देण्यात आली आहे. अमेरिकेतील चीनच्या दूतावासाने या संदर्भात ट्विट केलं आहे. चार असे मुद्दे आहेत. ज्यावर अमेरिकेनं शांत बसावं तरच डोनाल्ड ट्रम्प आणि शी जिंनपींग यांची बैठक चांगली होऊ शकते, अन्यथा जर ट्रम्प यांनी ही लाईन कॉ्रस करण्याचा प्रयत्न केला तर अमेरिका आणि चीनचे संबंध खराब होतील असा इशार चीनकडून देण्यात आला आहे. तैवानचा प्रश्न, लोकशाही आणि मानवाधिकाराची गोष्ट, चीनचा आपल्या विकासाचा आधिकार आणि राजनैतिक व्यवस्था या चार प्रश्नांमध्ये अमेरिकेनं दखल देण्याचा प्रयत्न करू नये, असं या ट्विटमध्ये म्हटलं आहे. हा ट्रम्प यांच्या भेटीपूर्वी चीनचा अमेरिकेला उघड उघड इशाराच मानला जात आहे. दरम्यान यावर आता अमेरिका काय भूमिका घेणार? हे पाहावं लागणार आहे.


दरम्यान, चीन आणि अमेरिकेमध्ये आधीच मोठा तणाव आहे. अमेरिकन टॅरिफ वॉरमुळे चीन आणि अमेरिकेमध्ये निर्माणा झालेला संघर्ष संपूर्ण जगानं पाहिला आहे. तसेच त्यानंतर अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध सुरू झालं. युद्धकाळात चीनने इराणला मदत केल्याचा आरोप देखल होत आहे. ही गोष्ट अमेरिकेला फारशी रुचणारी नाही, तसेच अमेरिका कायमच चीनलपा आपला प्रतिस्पर्धी मानत आला आहे. त्यामुळे अशा वातावरणात आता ट्रम्प आणि शी जिंनपींग यांची बैठक होणार आहे. या बैठकीकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे.

Comments


bottom of page