top of page

डोनाल्ड ट्रम्प, पंतप्रधान मोदींचे अपहरण करणा काय? माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचे वदग्रस्त वक्तव्य

मुंबई: जानेवारी 2026 च्या सुरुवातील एका राजकीय वादान भारतीय राजकारणाला हादरवून सोडले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या अमेरिकेतील अटकेचा हवाला देत पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. चव्हाण यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतीय पंतप्रधानांचे अपहरण करू शकतात का? असा प्रश्न विचारला आहे. भाजपने या विधानावर तीव्र आक्षेप घेत याला “ भारविरोधी मानसिकता” म्हटले आहे. जम्मू आणि काश्मिरचे माजी डिजीपी एसपी वैद यांनही चव्हाणांवर टीका केली आणि ते देशाचा अपमान करत असल्याचे म्हटले आहे.


महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एका सार्वजनिक निवेदनात व्हेनेझुएलावर अमेरिकेच्या लष्करी कारवाईचा उल्लेख केला. अमेरिकेच्या शुल्क आणि भारतावरील आर्थिक दबावाच्या मुद्यावर बोलताना त्यांनी विचारले, “ आता प्रश्न असा उद्भवतो व्हेनेझुएलामध्ये घडलेल्या घटनेसारखेच काही भारतात घडेल का? ” “ ट्रम्प आपल्या पंतप्रधानांचे अपहरण करतील का?” हे विधान सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये कैद झाले आहे. 3 जानेवारी 2026 रोजी झालेल्या अमेरिकेच्या लष्करी कारवाईचा संदर्भ देत चव्हाण बोलत होते. ज्यामध्ये अमेरिकेने व्हेेनेझुएलाची राजधानी कराकसवर हल्ला केला आणि राष्ट्राध्यक्ष मादुरो आणि त्यांच्या पत्नी सिलिया फ्लोरेस यांना अटक केली.


चव्हाण हे प्रश्न विचारत होते की, व्हेनेझुएलासारख्या देशांवर अमेरिकेचे आर्थिक निर्बंध आणि लष्करी हस्तक्षेप लादता येईल का आणि भारतही बळी पउू शकतो का. तथापि, या विधानावर काँग्रेस किंवा चव्हाण यांच्याकडून कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. ही टिप्पणी अशा वेळी आहे जेव्हा भारत आणि अमेरिकेतील व्यापारी संबंध मजबूत आहेत, पंरतु जकातीसांरख्या मुद्यांवर मतभेतद कायम आहेत.


भाजपने च्हाण यांच्या विधानवार तात्काळ टीका केली आणि ते विरोधकांच्या “ हताशतेचे” परिणाम असल्याचे म्हटले. पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी एक्स वर पोस्ट केली की, “ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण निर्लज्जपणे भारतातील परिस्थितीची तुलना व्हेनेझुएलाशी करत आहेत. ‘ व्हेनेझुएलात जे घडले ते भारतात घडू शेकते का’ असे विचारून काँग्रेस स्पष्टपणे आपली भारतविरोधी मानसिकता दाखवत आहे. ” भंडारी पुढे असा आरोप करतात की काँग्रेस दररोज नवीन पातळीला जात आहे.

भाजपने म्हटले की, अशी विधाने देशाच्या सार्वभौमत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात आणि विरोधकांच्या मोदीविरोधी राजकारणाचा पर्दाफाश करतात. भाजपने काँग्रेसवर ‘ भारतविरोधी’ असल्याचा अरोप कण्याची ही पहिलीच वेळ नाही. लोकसभा निवडणुकीपासून दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत.


त्याचबरोबर जम्मू आणि काश्मीरचे माजी डिजीपी एसपी वैद यांनीही चव्हाण यांच्या विधानवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी एक्स पोस्टवर म्हटले आहे की, “ ट्रम्प आणि अमेरिकेने व्हेनेझुएलाशी जे केले ते त्यांच्यासाठी अपमानास्पद आहे. तुमच्या देशासोबतही असेच घडावे असे तुम्हाला वाटते का?” “ तुम्हाला मोदीजींचा इतका द्वेष आहे का?” वैद यांनी पुढे विचारले की, चव्हाण यांना असे विधान करण्यास लाज का वाटली नाही आणि ते देशभक्त नाहीत का?, काँग्रेस नेते इतके निराश झज्ञले आहेत की, ते भारतविरोधी विधाने करत आहेत. ही प्रतिक्रिया सोशल मिडियावर व्हायरल झाली असून हजारो लाईक्स मिळाल्या आहेत.


भारताने व्हेनेझुएलावरील अमेरिकेच्या हल्ल्यांद्दल “ खोल चिंता’ व्यक्त केली. परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करून सर्व पक्षांना या प्रदेशात स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी शांततापूर्ण संवादाद्वारे समस्या सोडवण्याचे आवाहन केले आहे. भारताने कोणत्याही लष्करी हस्तक्षेपाचा निषेध केला आणि व्हेनेझुएलाच्या सार्वभौमत्वाचा आद करण्याचे वचन दिले. ही भूमिका भारताच्या परराष्ट्र धोरणाशी सुसंगत आहे, जी हस्तक्षेप न करण्यावर आणि बहुपक्षीयतेवर भर देते.

Comments


bottom of page