दिल्लीस्फोटात कोडवर्ड चा वापर: ‘दावत के लिए बिर्याणी तैयार..’ चॅट बॉक्समध्ये धक्कादायक खुलासा
- Navnath Yewale
- Nov 12
- 1 min read

नवी दिल्ली : दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण देश हादरून गेला आहे. या स्फोटात 12 जणांचा मृत्यू झाला असून 25 जण जखमी झाले आहेत. तपास यंत्रणा जसजया तपास करत आहेत तसतशी धक्कादयक माहिती समोर येणत आहे. याप्रकरणात आता सर्वात मोठा खुलासा झाला आहे. स्फोटासंदर्भातील संभाषण लपवण्यासाठी चॅट बॉक्समध्ये कोडवर्डचा वापर केला.
दिल्ली स्फोटासाठी प्रामुख्याने अश कोडवर्डचा वापर केला ज्यामुळे कोणालाच संशय येणार नाही.दावत आणि बिर्याणी हे कोडवर्ड वापरले ‘दावत के लिए बिरयाणी तैयार है’ असं म्हटलं हे कोडवर्ड वापरूनच संपूर्ण भयंकर कट रचला होता. यामध्ये ‘दावत’ म्हणजे स्फोट किंवा हल्ला, तर ‘बिर्याणी’ म्हणजे स्फोटक पदार्थ, सायबरपासून वाचवण्यासाठी ही युक्ती वापली जात होती.
रिपोर्टनुसार, हा मेसेज शाहीनकडून पाठवण्यात आला होता, एनआयएच्या डिजिटल फॉरेन्सिक तपासणीदरम्यान हा खुलासा झाला आहे. तपासात स्पष्टपणे दिसून येतं की, लाल किल्ला स्फोट हे एका संघटित मॉड्यलचं काम होतं. दिल्ली पोलिसांनी हरियाणा, उत्तर प्रदेश आणि जम्मू आणि काश्मीरमधून अनेक संशयितांना ताब्यात घेतले आहे. संपूर्ण दिल्लीत सुरक्षा व्यवस्था हाय अलर्टवर आहे.
दिल्ली स्फोट प्रकरणाचा तपास एनआयए अधिक वेगाने करत आहे आणि आता याप्रकरणात मोठे खुलासे समोर येत आहेत. हरियाणातील फरीदाबाद येथील डॉ. मुझम्मिल शकीलच्या दोन खोल्यांमधून 2900 किलो स्फोटकं जप्त करण्यात आली. यानंतर आता त्याच्या फोनची तपासणी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. 26 जाणेवारी आणि दिवाळीला लाल किल्ल्यावर स्ूफोट घडवण्याचा त्याचा प्लॅन होता. तसेच डॉ. मुझम्मिल आणि डॉ. उमर यांनी लाल किल्ल्याची रेकी केली होती.



Comments