धक्कादायक! भारतात पहिल्यांदाच ईव्हिएमचा झाला पराभव
- Navnath Yewale
- Aug 14
- 2 min read
सर्वोच्च न्यायालयात फेर मतमोजणीत हारलेला उमेदवार झाला विजयी, सुप्रीम कोर्टाने हरयाणातील पानीपत जिल्ह्यातील बुआना लाखू ग्रामपंचायतीची निवडणुकच केली रद्द

देशात सध्या सदोष मतदार याद्यांवरून धमासान सुरू असताना तसंच ईलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनच्या घोटाळ्यांची चर्चा सुरू असताना एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. भारतात पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधिशांसमोर ईव्हिएम मशिनमधील मतांची पुन्हा मोजणी झाली. या मोजणीमध्ये धक्कादायक निकाल समोर आला. पराभूत झालेल्या उमेदवाराला सर्वाधिक मतं मिळाल्याचं स्पष्ट झालं त्यामुळं सुप्रीम कोर्टानं ही निवडणूकच रद्द केली.
हरयाणाच्या पनीपत जिल्ह्यातील बुआना लाखू ग्रामपंचायतच्या निवडणुकीत हा प्रकार घडला आहे. कारण कोर्टाच्या निरिक्षणाखाली झालेल्या ईव्हिएमच्या पुन: मतगणनेत अपिलकर्त्या उमेदवाराला सर्वाधिक मत मिळाल्याचं सिद्ध झालं. त्यामुळं सुप्रीम कोर्टानं ही सरपंचपदाची निवडणूकच रद्दबातल केली. न्या.सुर्यकांत, न्या. दीपकांकर दत्ता आणि न्या. एन.के. सिंह यांच्या खंडपीठानें पानीपतच्या उपायुक्तांसह निवडणूक अधिकार्यांना देान दिवसांत एक अधिसूचना काढून अपिलकर्ता मोहित कुमारला विजयी घोषित करून त्यांना तात्काळ पदभार स्विकारण्याला परवानगी देण्याचे आदेश दिले.
सरपंचदासाठीची ही निवडणुक 2 नोव्हेंबर 2022 मध्ये झाली होती. यामध्ये कुलदीप सिंह या उमेदवाराला निवडणुक अयोगानं विजयी घोषित केलं होतं. या निकालाला माहित कुमार या प्रतिस्पर्धी उमेदवारानं अतिरिक्त सिव्हील न्यायाधीसांसह निवडणूक न्यायाधिकरणासमोर या निवडणूक निकालाला अव्हान दिलं. त्यामुळं 22 एप्रील 2025 रोजी एका मतदान केंद्रावर पुन: मतमोजणीला परवानगी मिळाली.
पण पंजाब आणि हरयाणा हायाकार्टानं 1 जूलै रोजी ही परवानगी रद्द केली. अशा प्रकारे दोन न्यायाधिकारांसमोर दाद न मिळाल्यानं माहित कुमारनं सुप्रीम कोर्टात अतिप केलं. यानंतर 31 जूलै रोजी सुप्रीम कोर्टानं न्या.सुर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं जिल्हा निवडणूक अधिकार्यांना सर्व केंद्रांवरील ईव्हिएम सुप्रीम कोर्टातील रजिस्ट्रारसमोर आणण्याचे आदेश दिले.
या आदेशात कोर्टानं म्हटलं की, रजिस्ट्रार यांनी फक्त वादग्रस्त मतदान केंद्रावरील नव्हे तर सर्व केंद्रावरील ईव्हीएम मशिनमधील मतांची पुन्हा मतमोजणी करतील. तसंच ही मतमोजणी करताना व्हिडिओ शुटिंगही केलं जाईल. तसंच मत पडताळीणीवर याचिकाकर्ते आणि प्रतिवादी यांच्या एका अधिकृत प्रतिनिधी तथा वकिलांद्वारे या अंतिम मोजणीवर स्वाक्षर्या करतील कोर्टाच्या या आदेशानुसार रजिस्ट्रार यांनी सर्व केंद्रावरील ईव्हिएमची पुन्हा पडताळणी केली. यामध्ये अपिलकर्ते माहित कुमार यांना 1,051 मतं पडली तर प्रतिवादी कुलदीप सिंह 1,000 मत मिळाली त्यामुळं सहाजिकचं निवडणूक अयोगानं आधी पराभूत म्हणून घोषित केलेला उमेदवार प्रत्यक्षात विजयी झाला.
Comments