top of page

नेपाळमध्ये अराजकता: सरकरीस्थळांना लक्ष्य, माजी पंतप्रधानांच्या पत्नीची हत्या, पंतप्रधान के.पी.शर्मा ओली यांचा राजीनामा; जीव मुठीत घेवून मंत्र्यांचे देशाबाहेर पलायन

ree

नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदीनंतर संतप्त झालेल्या तरुणांच्या झुंडीने संसदचे पेटवून दिल्याने अनेक नेते परांगदा झाले आहेत. नेपाळचे गृहमंत्री रमेश लेखक आणि कृषी मंत्री रामनाथ अधिकारी यांच्या सह अनेक मंत्र्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. नेतपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली आणि राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी राजीनामा दिलेला आहे. नेपाळचे अनेक मंत्री लष्कराच्या हेलीकॉप्टरने काठमांडू सोडून पळाले आहेत.आंदोलकांनी अनेक मंत्र्यांना राष्ट्रपतीचे निवासस्थान जाळून टाकले आहे. कर्फ्यूनंतरही नेपाळच्या स्थितीवर कोणताही परिणाम झालेला नाही. काल झालेल्या आंदोलनात 19 जणांचा मृत्यू झाला होता. आज महोत्तरी येथील जलेश्वर जेलची भिंत पाडल्याने त्यातील एकून 572 कैदी फरार झाले आहेत.


नेपाळमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तरीही परिस्थितीवर कोणाचेही नियंत्रण राहिलेले नाही. आंदोलकांनी अर्थमंत्र्यांवर हल्ले करत त्यांचा पाठलाग करून त्यांना मारहाण केली आहे. नेपाळची राजधानी काठमांडू, ललितपूर आणि भक्तापूर येथे संचारबंदी लागू केली आहे. तरीही आंदोलकांनी नेपाळचे पंतप्रधान के.पी. ओली यांच्या पार्टी ऑफिसला आग लावली आणि अनेक जागी तोडफोड केली आहे. रस्त्यांवर तरुणांचे तांडेच्या तांडे फिरत आहेत. रस्ते तरुणांनी भरले आहेत. पार्लमेंट इमारतीजवळ देखील त्यांची निदर्शने सुरू आहेत. सोशल मीडियाच्या बंदीनंतर हे आंदोलन सुरू झाले.


दरम्यान, आंदोलकांनी महोत्तरी येथील जलेश्वर तुरुंगाची भिंत तोडल्याने आतील 572 कैदी फरार झाले आहेत. काठमांडू पोस्टच्या बातमीनुसार पोलिस अधिक्षक हेरंब शर्मा यांनी सांगितले की ही घटना सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. जेव्हा लाठ्याकाठ्या घेऊन 500 हून अधिक आंदोलकांनी कैद्यांसह हा प्रकार केला. येथील परिस्थिती पाहून पोलिस काहीही करू शकत नव्हती. जिल्हा प्रशासनाने सायंकाळी 6:40 वाजल्यापासून जलेश्वर येथेही कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला.


नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी सर्व पक्षांना सयंम पाळण्याचा आणि संकटावर उत्तर शोधण्यासाठी चर्चा करण्याचे आवाहन केले होते. मात्र त्यांनी राजीनामा दिला आहे.पंतप्रधान के.पी.शर्मा ओली यांनी यापूर्वीच राजीनामा दिलेला आहे. आरसपी प्रमुख रबी लामिछाने यांनी नागरिकांना देशाच्या संपत्तीचे संरक्षण करण्याचा आग्रह केला आहे. त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा, पोलिस, सुरक्षा एजन्सी आणि न्यायालयाच्या संबंधित दस्तावेज महत्वपूर्ण राष्ट्रीय संपत्ती आहे. याच्या संरक्षणात ढीलाई झाली तर ही संवेदनशील सामुग्री नष्ट होईल आणि त्यामुळे राष्ट्राला मोठे नुकसान होऊ शकते.


नेपाळचे माजी पंतप्रधान झालानाथ खनाल यांच्या घरावर हल्ला झाला. आंदोलकांनी त्यांच्या घराला आग लावली. खनाल यांच्या पत्नी राजलक्ष्मी चित्रकार या घरातच होत्या. आंदोलकांनी त्यांना लक्ष्य केले. घराला लागलेल्या आगीत त्या गंभीर भाजल्या आणि त्यांचा मृत्यू झाला आहे. ही घटना दल्लू येथील त्यांच्या निवासस्थानी घडली. आंदोलकांनी आग लावताना राज्यलक्ष्मी यांना आता कोंडले होते. त्यामुळे त्यांना स्वत:चा जीव वाचवता आला नाही.


खनाला यांच्या पत्नी राज्यलक्ष्मी यांना जळालेल्या अवस्थेत कीर्तिपूर बर्न हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे जगात खळबळ माजली आहे. सोमवारपासून सुरू झालेल्या ॠशप ू आंदेालनाला आता आणखी हिंसक वळण आले आहे. अधिकार्‍यांकडून या हल्ल्याबाबत अद्याप कोणतेही निवेदन जारी करण्यात आले नही.

दरम्यान, सीपीएन (युनिफाइड सोशलिस्ट ) पक्षाचे नेते नरेश शाही यांच्या मते, आंदोलकांनी खनाल यांच्या घरात आग लावली. त्यामुळे त्यांच्य पत्नी गंभीररित्या जखमी झाल्या. जेव्हा आंदोलकांनी आग लावली, तेव्हा त्या त्यांचा मुलगा निर्भीक खनाल यांच्यासह घरी होत्या. आगीमध्ये जळाल्यानंतर त्यांना छावणी येथील नेपाळी सैन्याच्या रुग्णालयात नेण्यात आले. पण तेथून त्यांना तातडीने कीर्तिपूर रुग्णालयात हलवण्यात आले. झालानाथ खनाल यांना घराला आग लागण्यापूर्वी नेपाळी सैन्याने वाचवले होते.

Comments


bottom of page