top of page

नेपाळमध्ये पुन्हा जेन-झी ची निदर्शने सुरू,परिस्थिती गंभीर!

ree

बिहारच्या सीमेलगत असलेल्या नेपाळच्या बारा जिल्ह्यात गुरुवारी सलग दुसर्‍या दिवशी तणाव कायम राहिला. बुधवारी सीपएन-यूएमएल कार्यकर्त्यांशी संघर्ष करणारे जेन-झी म्हणून ओळख देणारे तरुण निदर्शक पुन्हा रस्त्यावर उतरले. सकाळपासून सिमराच्या रस्त्यावर निदर्शक जमले आणि पोलिसांशी संघर्ष झाला.


परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी स्थानिक अधिकार्‍यांनी दुपारी 1 ते रात्री 8 वाजेपर्यंत कर्फ्यू लागू केला आहे. पोलिसांशी झालेल्या संघर्षानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पुन्हा कर्फ्यू लागू करण्यात आला, ‘असे सहाय्यक मुख्य जिल्हा अधिाकरी छबिराम सुबेदी यांनी एएनआयला फोनवरून सांगितले.


कालच्या संघर्षाबाबत दाखल केलेल्या नाव असलेल्या व्यक्तींना पोलिसांनी अटक करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप आंदोलक निदर्शकांनी केला आहे. याआधीची घटना 19 नोव्हेंबर रोजी घडली होती, जेव्हा सिमरा चौक आणि सिमरा विमानतळाजवळ झालेल्या संघषाृत सहा जेन-झी समर्थक जखमी झाले होते. या गटाने सहा यूएमएल कार्यकर्त्यांविरुद्ध तक्रार दाखल केली. बुधवारी झालेल्या तणावसंदर्भात पोलिसांनी जितपुरसिम्रा उपमहानगरपालिकेचे प्रभाग 2 चे अध्यक्ष बहादूर श्रेष्ठ आणि प्रभाग 6 चे अध्यक्ष केमुद्दीन अन्सारी यांना ताब्यात घेतले. सिमरा विमानतळाजवळ संघर्ष वाढल्यानंतर अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडाव्या लागल्या, ज्यामुळे विमानतळाचे कामकाज स्थगित करावे लागले.


दरम्यान, 5 मार्च 2026 रोजी होवू घातलेल्या निवडणुकांपूर्वीच यूएमएल नेत्यांनी जिल्ह्यांना भेट देण्याची योजना आखली तेव्हा तणाव सुरू झाला. सप्टेंबरच्या उठावादरम्यान, लुटलेली शस्त्रे घेऊन मुक्तपणे फिरणार्‍या शेकडो कैद्यांच्या सुरक्षिततेबद्दल तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली. सप्टेंबरमध्ये सत्ता बदल झाल्यापासून नेतपाळमध्ये राजकीय संक्रमण सुरू आहे. त्यावेळच्या निदर्शनांमुुळे तत्कालीन पंतप्रधान आणि यूएमएल अध्यक्ष के.पी. ओली यांना राजीनामा द्यावा लागला. दोन दिवसांच्या निदर्शनांमध्ये देशभरात 76 जणांचा मृत्यू झाला होता.


दरम्यान, ओली सरकार कोसळल्यानंतर 12 सप्टेंबर रोजी माजी मुख्य न्यायाधीश सुशीला कार्की यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन करण्यात आले. त्यांच्या नियुक्तीनंतर, कार्की यांनी संसद विसर्जित करण्याची आणि नवीन निवडणुका घेण्याची शिफारस केली. राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी त्यांच्या शिफारशीनुसार संसद विसर्जित केली आणि 5 मार्च 2026 रोजी निवडणुका घेण्याची घोषणा केली.

Comments


bottom of page