पंतप्रधान नरेंद्र मोंदीचे उत्तराधिकारी देवेंद्र फडणवीस! बाप जिवंत असताना उत्तराधिकारी शेधनं आपली संस्कृती नाही- मुख्यमंत्री फडणवीस
- Navnath Yewale
- 5 hours ago
- 2 min read

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वयाची पंच्याहत्तरी पूर्ण केली. वयाची 75 वर्षे पूर्ण झाल्यानंतर राजकारणातून निवृत्ती घेण्यासंदर्भात मोदी यांनी आदेशही काढला होता. त्यामुळे आता मोदींच्या उत्तराधिकार्याबाबत चर्चा होऊ लागली आहे. मोदींचे उत्तराधिकारी म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नावाचा उल्लेख सातत्याने केला जातो. या सगळ्यावर फडणवीसांनी मार्मिक प्रतिक्रिया दिली आहे. ते एका वृत्तवाहिणीच्या कार्यक्रमात बोलत होते.
यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “ बाप जिवंत असताना उत्तराधिकारी शोधारी आपली संस्कृती नाही, ही मुघलांची संस्कृती आहे. मुघल असं वागायचे. अपण तसं काही करत नाही. तसेच आत्ता पंतप्रधान मोदी यांचा उत्तराधिकारी शेाण्याचं काहीच कारण नाही. ते आत्ता देशाचं अतिशय चांगल्या पद्धतीने नेतृत्व करत आहेत. त्यांच्यामुळे जागतक पातळीवर भारताची मोठी प्रतिमा तयार झाली आहे. पूर्वी भारत म्हणजे ‘ किस झाड की पत्ती?’ अशी आपली स्थितीहोती. मात, आता जग आपल्याकउे आशेने पाहतयं.”
“ भारत आता जगभरातील भूराजकीय स्थिती हाताळण्याइतका मोठा झाला आहे. हे केवळ मोदींमुळे शक्य झालं आहे. त्यामुळे हेच नेतृत्व भारताला पुढे नऊ शकतं.” सुदैवाने पंतप्रधान मोदी यांची तब्येत उत्तम आहे. त्यांची एनर्जी उत्तम आहे. आज ते एखाद्या 40 वर्षांच्या तरुणाला लाजवेल इतकं काम करत असतात. ते 17-18 तास काम करत असतात. इतकं काम करूनही एखाद्या बैठकीत आम्ही त्यांना कधी साधी जाभयी देताना पाहिलं नाही.
फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, “ आपल्याकडे इतका चांगला नेता असताना, इतकं कणखर नेतृत्व असताना इापल्याला सध्या त्यांच्या उत्तराधिकार्याचा विचार करण्याची आवश्यकता नाही. त्याचबरोबर मोदी हे शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या एकदम तंदुरुस्त आहेत. मोदी असे तंदुरुस्त असेपर्यऐत इतरांचा विचार करायची गरज नाही. त्यामुळे 2029 ला देखील मोदी हेच भारताचे पंतप्रधान होतील.”
दरम्यान भारतीय जनता पार्टीत सध्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी नेत्याचा शोध सुरू आहे. विद्यमान अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा कार्यकाळ संपला असून देवंद्र फडणवीस हे या पदाच्या शर्यतीत असल्याची देखील चर्चा आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी अनेकदा स्पष्ट केलं आहे की त्यांचं लक्ष सध्या केवळ महाराष्ट्रावर आहे.



Comments