पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौर्यानंतर मुख्यमंत्री ऍक्सन मोडवर ,स्थनिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणणीती; विभागनिहाय आढावा बैठकीचे आयोजन
- Navnath Yewale
- Oct 9
- 1 min read

भाजपने आगामी काळात होवू घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठीची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मैदानात उतरले आहेत. येत्या काळात टप्याटप्याने जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका व नगरपंचायती तर त्यानंतर महानगरपालिका निवडणुका होणार आहेत.
या निवडणुकीसाठी गेल्या काही दिवसापासून भाजपची तयारी सुरू आहे. त्यामुळेच आता मुख्यमंत्री फडणवीस अॅक्शन मोडवर आले असून राज्यभरातील तयारीचा आढावा येत्या तीन दिवसात घेणार आहेत. त्यासाठी तीन दिवसांत राज्यातील सहा विभागाचा आढावा घेणार आहेत.
राज्यात येत्या काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमिवर राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. सर्वच पक्ष निवडणुकीच्या कामाला लागला आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बुधवारी रात्री मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमिवर मुंबईतील भाजपचे मंत्री, आमदार, खासदार आणि मंत्र्यांना कानमंत्र दिला आहे. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. त्यासाठी 10 ते 13 ऑक्टोबर दरम्यान तीन दिवसात सहा विभागाचा विभागनिहाय आढावा घेणार आहेत.
या विभाग स्तरावरील बैठकीस राज्यातील प्रत्येक जिल्ह्याचा आढावा जिल्हानिहाय घेतला जाणार आहे. या बैठकीस प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. त्यांच्याकडून जिल्ह्यातील परिस्थिती जाणून घेतली जाणार आहे. त्यानुसार येत्या काळात स्थानिक पातळीवरील समीकरणे लक्षात घेऊन निवडणुकीत महायुती की स्वबळावर निवडणुक लढवायची याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबतच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत 10 ऑक्टोबरला नाशिक, मराठवाडा या दोन विभागाचा आढावा घेतला जाणार आहे तर 11ऑक्टोबरला पश्चिम महाराष्ट्र, विदर्भाचा तर 13 ऑक्टोबरला अमरावती, कोकणाचा आढवा घेतला जाणार आहे.
या आढावा बैठकीत भाजपच्या कार्यकर्त्याऐना मार्गदर्शन केले जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपच्या नेत्यांना विजयी रणनितीचा ‘ कानमंत्र’ देणसाठी ही बैठक बोलावली जाणार आहे. या बैटठकीत प्रत्येक लोकप्रतिनिधीला त्यांच्या क्षेत्रातील बूथ स्तरावरची जबाबदारी निश्चित करून दिली जाणार असल्याचे समजते. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Comments