top of page

पंतप्रधानांचा उपदेश की, अपयशाचा पुरावा? देश चालवणं आता ‘कॉम्प्रमाइज्ड’ पंतप्रधानांच्या बसची गोष्ट राहिली नाही- राहुल गांधी

पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर तेलाचे संकट गडद होत असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा वापर संयमाने करण्याचे अवाहन केले आहे. मात्र, पंतप्रधानांच्या या ‘सल्ल्यावर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी टीका केली आहे. “ मोदींनी दिलेले सल्ले हे उपदेश नसून त्यांच्या अपयशाचे पुरावे आहे, “ अशा शब्दांत गांधींनी निशाणा साधला आहे राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘ एक्स’ वर पोस्ट केली.


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतेच जनतेला काही गोष्टींचा त्याग करण्याचे आवाहन केले आहे. यामध्ये सोनं न खरेदी करणे, परदेशात न जाणे, पेट्रोलचा वापर कमी करणे, खतं आणि खाद्यतेलाचा वापर मर्यादित करणे, मेट्रोने प्रवास करणे आणि ‘ वर्क फ्रॉम होम’ ला प्राधान्य देणे अशा मुद्यांचा समावेश होता. यावर राहुल गांधींनी ट्विट करत मोदी सरकारला धारेवर धरले आहे.


“ 12 वर्षात देशाला अशा वळणावर आणून ठेवले आहे की, आता जनतेला काय खरेदी करावे आणि कुठे जावे हे सांगावे लागत आहे. स्वत:च्या जबाबदारीतून पळ काढण्यासाठी प्रत्येक वेळी दोष जनतेवर टाकला जातो. देश चालवणे आता ‘कॉम्प्रमाईज्ड पीएम’ च्या बसची गोष्ट राहिलेली नाही, असा निशाणा राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला.

राहुल गांधींच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असून भाजपकडून यावर काय प्रत्युत्तर येते हे पाहावे लागणार आहे.


निवडणुकीनंतरच का?- अखिलेश यादव (समाजवादी पक्ष): जेव्हा निवडणुका सुरू होत्या तेव्हा ‘सर्व काही ठिक’ होते आणि आता निवडणुका संपताच ‘ संकट’ कसे आठवले? निवडणुकांमध्ये चार्टर प्लेन चा वापर केला गेला, तेव्हा इंधन कुठे गेले होते?असा सवाल ही त्यांनी केला.

पेट्रोल-डिझेल दरवाढीचे संकेत तर नाहीत ना?- रोहित पवार : “ आता निवडणुका झाल्याने पंतप्रधानांचे आवाहन म्हणजे, पेट्रोल-डिझेल दरवारीचे संकेत तर नाहीत ना?

Comments


bottom of page