पाकिस्तानात भयंकर स्फोट: 15 जणांचा मृत्यू
- Navnath Yewale
- 2 days ago
- 2 min read
पंजाब प्रांतातील केमिकल कारखान्याच्या बॉयलरचा स्फोट, इमारतीच्या ढिगार्याखाली अनेक जण दबल्याची भीती

फैसलाबाद: पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील फैसलाबाद जिल्ह्यातील एका केमिकल कारखान्यात झालेल्या बॉयलरच्या स्ूफोटात किमान 15 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. आज सकाळी मलिकपूर परिसरात ही दुर्दैवी घटना घडली. ज्यामुळे जवळच्या इमारती कोसळल्या, ढिगार्याखाली आणखी लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
स्थानिक अधिकार्यांनी तात्काळ बचाव कार्य सुरू केले आहे . कारखान्याच्या व्यवस्थापकाला अटक करण्यात आली आहे, तर मालक फरार आहे. पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त करत सविस्तर अहवाला मागवला आहे. या अपघाताने पुन्हा एकदा पाकिस्तानमधील खराब औद्योगिक सुरक्षा मानके आणि कालबाह्य उपकरणांचे धोके अधोरेयित केले आहेत.
पंजाबच्या फैसलबाद जिल्ह्यातील मलिकपूर येथील एका केमिकल कारखान्यात आज सकाळी झालेल्या बॉयलरच्या स्फोटात मोठा विध्वंस झाली. या विनाशकारी स्फोटात किमान 15 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की, आजूबाजूच्या इमारती कोसळल्या. उपआयुक्त रजा जहांगीर अन्वर यांनी सांगितले की, बचाव पथकांनी ढिगार्यातून मृतदेह बाहेर काढले आहेत. जखमींना तातडीच्या उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ढिगार्याखाली आणखी लोक अडकले असण्याची भीती आहे. ज्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.
स्फोटा नंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले, जलद बचाव कार्यही सुरू केले. बचाव 1122 आणि अग्नीशमन दलाच्या पथके ढिगारा काढून अडकलेल्यांना वाचवण्यासाठी काम करत आहेत. पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांनी या दु:खद घटनेवर तीव्र दु:ख व्यक्त केले, तसेच बळींच्या कुटुंबीयांबद्दल सहानुभूती व्यक्त केली. त्यांनी फैसलाबाद आयुक्तांकडून सविस्तर अहवाल मागवला आहे आणि जखमींना सर्वोत्तम वैद्यकिय सेवा देण्याचे अधिकार्यांना निर्देश दिले आहेत.
या घटनेमुळे पाकिस्तानात औद्योगिक सुरक्षा मानंकांवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. स्फोटानंतर स्थानिक प्रशासनाने लगेचच कारखाना व्यवस्थापकाला अटक केली, पंरतु कारखाना मालक घटनास्थळावरून पळ काढण्यात यशस्वी झाला. पोलिस अधिकार्यांचा असा विश्वास आहे की, खराब सुरक्षा मानके आणि जुनी, अयोग्य उपकरणे ही अशा अपघातांची मुख्य कारणे आहेत. या घटनेने पुन्हा एकदा हे दाखवून दिले आहे की, नियमांकडे दुर्लक्ष करणे आणि सुरक्षा उपायांचा अभाव मौल्यवान जीवांना कसा धोका निर्माण करतो.
दरम्यान फैसलाबादमधील हा बॉयलर स्फोट हा पाकिस्तानच्या औद्योगिक अपघातांच्या वाढत्या यादीतील आणखी एक दु:खद अध्याय आहे. 2024 मध्येच, फैसलाबादमधील एका कापड गिरणीत बॉयलरच्या स्फोटात डझणभर कामगार जखमी झाले आणि गेल्या आठवड्यात कराचीतील एका फटाक्याच्या कारखान्यात चार जणांचा मृत्यू झला. या घटना औद्योगिक सुरक्षेबाबत देशाच्या गंभीर अभावाचे द्योतक आहेत. फरार कारखाना मालकासारख्या कृतीमुळे जबाबदारीवही प्रश्नचिन्ह उपस्थित होते.



Comments