पायलटचा वापर करून अजितदादांच्या विमानाचा अपघात घडवून आणला - आ. रोहित पवार पत्रकार परिषदेत सादरिकरण; पायलटने जानिवपूर्वक विमान खाली अपटवले,आणि स्फोट झाला
- Navnath Yewale
- 3 hours ago
- 4 min read

मुंबई : राज्याचे ज्येष्ठ नेते दिवंगत अजित पवार यांच्या अपघाती निधनाबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. अजित पवारांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते राहित पवार यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषदे घेत अपघाताबाबत आक्षेप नोंदवणारे मुद्दे सादरीकरण केले. यामध्ये रोहित पवार यांनी अजित दादांच्या विमान अपघातापासून विमान कंपनी, तपास प्रकरणात धक्कादायक दावे केले आहेत.
पायलटने अजितदादांच विमान जानिपूर्वक खाली आपटवलं आणि स्फोट घडवला: अपघाताच्या दिवशी बारामतीत दृष्यमान (व्हिजिबिलिटी) कमी असताना वैमानिक सुमित कपूर याने विमान माघारी न फिरवला खाली उतरवले. त्याने विमानाचा स्फोट करण्यासाठी जानिवपूर्वक खाली आदळवले, असा खळबळजनक आरोप रोहित पवार यांनी केला. ते बुधवारी मुंबईत पत्रकार परिषदेत सादरीकरणादरम्यान बोलत होते. यावेळी रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत अनेक नव्या शंका उपस्थित करत धक्कादायक दावे केले.
मुंबईवरुन बारामतीला जाण्यासाठी फार इंधनाची गरज नव्हती. तरीही अजितदादांच्या विमानाच्या पंखातील इंधनाच्या टाक्या पूर्णपणे भरण्यात आल्या होत्या. हे विमान बारामतीरुन हैदराबादला जाणार होते. तिथे विमानात पुन्हा इंधन भरता आले असते. मात्र, हे विमान सुरतवरुन मुंबईला येत असतानाच त्याच्या इंधन टाक्या पूर्णपणे भरल्या होत्या. या विमानात अपघाताच्यावेळी 300 ते 3500 लिटर इंधन होते. एवढेच नव्हे तर विमानाच्या टॉयलेटजवळ इंधनाचे अतिरिक्त कॅनही ठेवले होते. या सगळ्यात पायलटचा वापर करून अजित पवार यांच्या विमानाचा अपघात घडवण्यात आला, असे आम्हाला वाटते. विमानात जास्त इंधन असेल तर मोठा स्फोट होईल, हा आमचा संशय खरा ठरताना दिसत आहे. बारामतीच्या धावपट्टीवर उतरवण्यासाठी दृश्यमानता कमी असूनही पायलट समित कपूर यांनी माघारी न फिरता एक गिरकी घेऊन खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. किंबहूना त्यांनी विमान मुद्दाम खाली आदळवले आणि स्फोट घडवून आणला. असा आरोप रोहित पवार यांनी केला.
विमान लँडिंगसाठी 5000 इतकी दृश्यमानता लागते. मात्र, बारामतीत त्यावेळी 3500 इतकी दृश्यमानता होती. मुळात मुंबईहून उड्डाण करतानाच दृश्यमानता कमी होती. तरीही विमानाच्या उड्डाणासाठी परवानगी देण्यात आली. यानंतरही विमानाने उड्डाण केले तरी बारामतीत लँड करायला नव्हते पाहिजे. त्यामुळे या अपघाताबाबत घातपाताचा संशय अधिक बळावतो,असंही रोहित पवार म्हणाले.
व्हीएसआर कंपनीकडून पुराव्यांशी छेडछाड, कागदपत्रांमध्ये हेराफेरीची प्रयत्न : यावेळी रोहित पवार यांनी व्हीएसआर या विमानसेवा देणार्या कंपनीवरही गंभीर आरोप केले. व्हीएसआर कंपनीचा गोपी नावाचा हँडलर मुंबईत बसतो. तो फ्लाईट प्लॅनमध्ये फेरफार करू शकतो. माझ्या माहितीनुसार सध्या तपास सुरू असून व्हीएसआर कंपनीकडून कागदपत्रे मिळण्यात विलंब होत आहे. कारण व्हिएसआर कंपनीकडून सध्या कागदपत्रांमध्ये फेरफार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दिल्लीवरुन फ्लाईट प्लॅन आल्यानंतर हँडलर गोपीने त्यामध्ये बदल केले असावेत. त्यामुळे याप्रकरणाची चौकशी करताना त्यावेळी पाठवण्यात आलेली ई-मेल तपासावेत असे रोहित पवार यांनी म्हटले.
श्वेता सिंह यांच्यावर गंभीर आरोप: श्वेता सिंह! या महिलेवर गंभीर आरोप करत ती महाराष्ट्रातील एका राजकीय कुटुंबाशी संबंधीत असल्याचंही त्यांनी सांगितलं. रोहित पवार म्हणाले की, श्वेता सिंह यांच्याबाबत मी थोडक्यात सांगतो की, श्वेता सिंह या आपल्या महाराष्ट्राच्या सुनबाई होत्या, आता नाहीत. या डीजीसीएमध्ये काम करतात. फार मोठ्या कुटुंबात त्यांचं लग्न झालेलं होतं, जो सत्तेत पक्ष आहे मोठा, त्या कुटुंबाशी निगडीत या श्वेता सिंह होत्या. या कुटुंबात फार भावनिक गोष्ट झाली त्याचा आपण कधीच विचार करू शकत नाही. याचा अंदाज तुम्हाला आहे.
या श्वेता सिंह आज डीजीसीएमध्ये बसून त्यांच्या कॉन्टॅक्टचा वापर करून फार मोठं रॅकेट चालवतात. अजि पवारांच्या अपघाताच्या चौकशीच्या एजन्सीमध्ये ज्या अपूर्वा अगरवाल नावाच्या महिला आहे. त्या पूर्वी जेटएअरवेजमध्ये काम करत होत्या. त्यांच्यासह इतर सदस्यांना लेअरजेट विमान नेमकं कसं असतं हे माहिती नाही. त्यांना या समितीत श्वेता सिंह यांनी टाकलं असं आमचं मत आहे. अजित पवारांच्या अपघाताची चौकशी सुरु असताना या श्वेता सिंह यांना डीजीसीएमध्ये ठेवू नका अशी आमची मागणी आहे. कारण यांचा संपर्क फार मोठ्या स्तरावर पोहोचलेला आहे.
दरम्यान, श्वेता सिहं या माजी कमर्शिअल पायलट असून सध्या त्या डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हील एव्हिएशनल (डीजीसीए) अर्थात नागरी विमान वाहतूक महासंचलनालय चिफ फ्लाईट ऑपरेशन्स इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत आहेत. उड्डाण ऑपरेशन्स, नियमन, देखरेख आणि लेखापरिक्षण, उड्डाण सुरक्षा आणि जोखीम व्यवस्थापन, अपघात आणि दुर्घटनेचा तपास या क्षेत्रात त्यांचा अनुभव आहे. विमान वाहतूक उद्योगाबद्दल विश्लेषणात्मक, संघटनात्मक आणि समस्या सोडवण्याचं कौशल्य त्यांच्यामध्ये असून त्यांनी सुव्यवस्थित ऑपरेशनल प्रक्रिया तयार केल्या आहेत. यूएसओएपी ऑडिट आणि एफएए आंतरराष्ट्रीय ऑडिटचं त्यांना ज्ञान असल्याचं त्यांच्या सोशल मिडिया प्रोफाइवरुन कळते.
श्वेता सिंह यांचे राजकीय कनेक्शन : श्वेता सिंह या भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या सूनबाई होत्या. प्रमोद महाजन यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र राहुल महाजन यांच्याशी श्वेता सिंह यांनी लग्न केलं होतं. लग्नानंतर काही दिवसांतच घरगुती हिंसाचाराचे आरोप त्यांनी महाजन कुटुंबावर केले होते. पुढे लग्नानंतर केवळ वर्षभरातच ते या नात्यातून वेगळे झाले.
नरेश आरोरा यांना लक्ष्य : माझे आजोबा खूप मोठे आहेत, माझे काका खूप मोठे होते आणि मी रोहित पवार आहे.
अजितदादांच्या विमानाचा मुख्य पायलट सुमित कपूर खूप दारु प्यायचा. तो तीन ते चार वर्षासाठी निलंबित झाला होता. व्हीएसआरमध्ये तो कमी पगारावर काम करत होता. रोहित सिंह हा व्हिएसआरचा मालक विजय सिंग याचा मुलगा आहे. तो सध्या अमेरिकेतील मायामी येथे जाऊन राहत आहे. श्वेता सिंह ही रोहित सिंग याची पत्नी आहे. तीदेखील एका जेट कंपनीत होती. तिकडे रॅकेट चालवण्याच्या प्रकरणात त्यांना राजीनामा द्यायची वेळ आली. केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांचा तात्काळ राजीनामा घ्यायला हवा. ते व्हीएसआर कंपनीचा मालक रोहित सिंग याच्या लग्नाला होते. त्यांचे कौटुंबिक संबंध आहेत. सध्या ज्या चुका समोर आल्या आहेत त्यावर आम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहोत. मुळात हवाई उड्डाण मंत्री यांचाच व्हीएसआर कंपनीच्या मालकाशी संबंध आहे. तयचा मुलगा अमेरिकेत जाऊन बसलाय. त्याला परदेशात जाण्याची परवानगी कशी काय मिळाली? असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला.
लेगेसी आणि लिएर जेट ही वेगवेगळ्या प्रकारची विमान आहेत, ती चालवण्यासाठी वेगळा परवाना लागतो. तुम्ही या पैकी एक विमान चालवत असाल तर दुसरे विमान चालवू शकत नाही. मात्र, सुमित कपूर आणि रोहित सिंग हे दोघेही ही विमाने चालवत होते, याचे रेकॉर्ड आमच्याकडे आहेत. वत्यामुळे आता व्हीएसआरकडून बनावट कागदपत्रं बनवण्याचे काम सुरू आहे. व्हीएसआरचा एक वैमानिक कॅप्टन कार्लोस हा व्हेनेझुएलाचा होता. तो भारतात येताना पॅसेंजर म्हणून यायचा. पण विमानात शिरल्यानंतर तो कॉकपीटमध्ये जाऊन विमान चालवायचा व्हीएसआर कंपनीकडून अशा अनेक चुका लपवल्या गेल्या आहेत. असा आरोप रोहित पवार यांनी केला.



Comments