top of page

बीड, जालन्यामध्ये बंजारा समाज रसत्यावर; जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा

एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी बंजारा समाजाचा महाएल्गार

आमदार धनंजय मुंडे, विजयसिंह पंडित यांचा बीडमध्ये मोर्चात सहभाग


ree

हैदराबाद गॅझेटिअर नुसार मराठा समाज कुणबी आहे तर बंजारा समाजाही एसटी आरक्षणात असल्याच्या नोंदी आहेत. त्यामुळे सरकारने हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला एसटी आरक्षण द्यावे या प्रमुख मागणीसाठी आज बीड, जालना जिल्हा कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला.


मनोज जरांगे यांच्या मागणीनुसार सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाचा मार्ग सुखकर व्हावा या उद्देशाने हैदराबाद गॅझेटिअर लागू करण्याचा जीआर काढला. दरम्यान हैदराबाद गॅझेटिअरमध्ये बंजारा समाजाची एसटी प्रवर्गात नोंद असल्यचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे आता बंजारा समाजातून एसटी आरक्षणाची मागणी होत आहे. दरम्यान, हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाजाची एसटी प्रवर्गात नोंद असेल तर त्यांना एसटी आरक्षण देण्यास आमचा पाठिंबा आहे असे जरांगे पाटील यांनी घोषीत केले होते.

ree

याच पार्श्वभूमिवर आज बंजारा समाज रस्त्यावर उतरल्याचे पावयास मिळाले. पारंपारिक वेषभूषेत बंजारा समाजाच्या महिला मोठ्या प्रमाणात मोर्चात सहभागी झाल्या होत्या. राज्यात बंजारा समाज सध्या व्हीजेएनटी (ए) मध्ये आहे. मराठा समाजास ज्याप्रमाणे कुणबी आरक्षण लागू केले. त्याच धर्तीवर बंजारा समाजास एसटी आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील बंजारा समाज रस्त्यावर उतरला होता. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चास नेत्यांनी संबोधीत केले.

बीडमध्ये शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चा सुभाषरोड, साठे चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या अभिवादनानंतर मोर्चा जिल्हाधिकारी कार्याृलयावर धडकला. परळी विधान सभेचे माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे ,गेवराई विधानसभेचे आमदार विजयसिंह पंडित, मनोज जरांगे समर्थक गंगाधर काळकुटे यांनी मोर्चात सहभाग घेतला. उपस्थित राजकीय नेत्यांसह पदाकिधार्‍यांनी मोर्चास संबोधीत केले.

ree

धनंजय मुंडे यांच्या विरोधात घोषणाबाजी:

माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी मोर्चास संबोधीत करताना बंजारा आणि वंजारा एक असल्याचे वक्तव्य केले. आमदार धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यावरून चांगलाच वाद उफळला. आमदार मुंडे यांच्या वक्तव्यावर बंजारा बांधव चांगलेच संतप्त होत मोर्चात घोषणाबाजी केली. “वंजारा, बंजारा एक नाहीत, यापूर्वीच आमच्या ताटातले अडीच टक्के आरक्षण घेतले गेले आहे. आची भाषा, खान-पान सर्व वेगळं आहे. त्यामुळे आधिच आमच्या ताटातलं आडिच टक्के घेतलं आता हे चालणार नाही”. अशा विधानामुळे समाजात गैरसमज निर्माण होत आहे. सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी या वक्तव्यावरून मागणी केली आहे की, धनंजय मुंडे यांनी वंजार, बंजारा एक आहे हा शब्द मागे घ्यावा. मोर्चामध्ये घोषणाबाजी करत समाजाने आपली भूमिका यावेळी स्पष्ट केली.

Comments


bottom of page