बीडच्या एफडीए चे वरातीमागून घोडे!; मिठाई च्या आडून ‘स्वीट पॉयझन’ विकणार्या क्रूरकर्मांची पाठराखन?
- Navnath Yewale
- 2 hours ago
- 2 min read
शिरुर पोलिसांच्या धाडशी कारवाईला एफडीए चा लागम?, छापेमारीपश्चात तीन दिवसानंतर नमुन्यांचा सोपस्कार

बीड: बीडच्या दहिवंडी येथील भेसळयुक्त खवा कारखान्यातून शिरुर शहरासह इतर जिल्ह्यात भेसळयुक्त खवा विक्री करण्यात येत होता. दुधाशिवाय निर्माण होणारा भेसळयुक्त खवा बीडसह इतर जिल्ह्यात विक्री केला जात असल्याचे सुर्यप्रकाशा इतके सत्य असतना, शहरातील संशयित मिठाई दुकानातील खाद्य पदार्थांचे तात्काळ नमुने घेवून प्रयोगशाळेत पाठवणे अत्यावश्यक असताना एफडीए ने ठरवून तीन दिवसाचा विलंब केला. शिरुर पोलिसांच्या धाडशी कारवाईला सुरुंग लावून ‘भागीदारी’ टाळण्यासाठी, मिठाई दुकानातील भेसळयुक्त खाद्य पदार्थांची सोइस्कर विल्हेवाट लावता यावी यासाठीच एफडीएकडून मिठाई दुकानातील खाद्य पदार्थांचे निमुने घेण्यास विलंबाचा आरोप नागरिकांतून केला जात आहे.
बीडच्या शिरुर कासार तालुक्यातील दहिवंडी शिवारात भेसळयुक्त खवा कारखान्यावर शिरुर पोलिसांनी बुधवारी (दि.1) मध्यरात्री धाडशी कारवाई करत पुढील कारवाईसाठी प्रकरण बीडच्या एफडीएकडे सोपवले होते. बीड एफडीए विभागाच्या अधिकार्यांनी घटनास्थळावरील खवा, बर्फीसह भेसळयुक्त मानवी आरोग्यास हानीकारक रसायण जप्त करून गुरूवारी (दि.2) निष्काशीत केले. परिसरात जेसबी यंत्राद्वारे खड्डा घेवून निष्काशीत करण्यात आलेल्या भेसळयुक्त मालाच्या मोजदादीसाठी छापा मारण्यासाठी आलेल्या एफडीएच्या अधिकार्यांकडे कसल्याही प्रकारचा वजन काटा नव्हता, जप्त केलेल्या मालाची मोजदाद संशयित आरोपींनी सांगितली तेवढीच नोंद करण्यात आली. प्रत्यक्ष जेसीबी यंत्राच्या समोरील खोर्याच्या चार खेपा झाल्या एवढा भेसळयुक्त माल असताना एफडीए च्या कारवाईत केवळ 135 किलो खवा, बर्फी, रसायण आदी 35 हजार रुपयांच्या मुद्देमालाची नोंद करण्यात आल्याचा आरोप करत एफडीएची कारवाईवर दहिवंडीचे सरपंच कालिदास आघाव यांनी संशय व्यक्त केला.

छाप्या दरम्यान भेसळयुक्त जप्त माल, संशयास्पद पदार्थ निष्काशीत करेपर्यंत कारखान्याला सील लावणे बंधनकारक असताना एफडीए च्या अधिकार्यांनी पोलिस व माध्यप्रतिनिधींसमक्ष कारखान्याला सिल ठोकण्याची तसदी घेतली नाही. बुधवारी (दि. 1) छापेमारीनंतर गुरूवारी (दि.2) दुपारी 3:00 वाजे दरम्यान एफडीएचे अधिकारी पोलिस ठाण्यात हजर झाले. कारवाईच्या सोपास्काराची नोट घेवून आलेल्या एफडीएच्या अधिकार्यांनी शिरुर पोलिसात खद्यपदार्थाच्या भेसळखोरीचा गुन्हा दाखल केला. शिरुर पोलिसांच्या मदतीने अटक संशयित आरोपी व इतर दोघांना घेवून पोलिस निरिक्षक राजेश गाडवे, सहाय्यक पोलिस निरिक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या समवेत घटनास्थळ गाठले.
विना सील कारखान्यातील जप्त केलेला भेसळयुक्त माल जेसीबी यंत्राद्वारे वाहतूक करून खड्ड्यात निष्काशीत करण्यात आला. प्रत्यक्षात भेसळयुक्त कारखान्यातील खव्याची विक्री बीड सह इतर जिल्ह्यात होत होती, शहरातील मिठाईच्या अस्थापनांनाही याच खव्याचा पुरवठा केला जात असल्याचे सुर्यप्रकाशा इतके सत्य असताना कारखान्यावर छापेमारी सुरु असताना शहरातील मिठाईच्या अस्थापना सुरू होत्या. छापेमारी सोबतच शहरातील मिठाईच्या अस्थापनातील दुग्धजन्य खाद्य पदार्थांचे नमुने हस्तगत करणे अवश्यक होते. मात्र एफडीच्या अधिकार्यांनी जाणिवपूर्वक छापेमारीचा सोपस्कार करत मिठाई विक्रेत्यांना भेसळयुक्त खाद्य पदार्थांची सोईस्कर विल्हेवाट लावता यावी या उद्देशानेच शुक्रवारी सायंकाळी 4:00 वाजता च्या दरम्यान संशयित मिठाई अस्थापनातील खाद्य पदार्थांचे नमुने घेण्याचे ढोंग केल्याच्या तिव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
नागरिकांचा संताप: छापेमारीचे व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांतून मिठाई विक्रेत्यांवर संताप व्यक्त करण्यात येत आहे. मिठाईच्या नावाखाली ‘ स्वीट पॉयझन’ विक्रीकरणार्या अस्थापनावर शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष सोपान मोरे, उपजिल्हाप्रमुख अजिनाथ खेडकर यांनी शहरातील संशयित बिकानेर स्वीट होमवर हल्ल्याचा प्रयत्न करत संताप व्यक्त केला. मानवी आरोग्यास हानीकारक रसायणांच्या मिस्त्रणाचे खाद्य पदार्थ महिला,मुला-मुलींसह नागरिकांना विक्री करून त्यांच्या आरोग्याचा खेळ मांडणार्या क्रूरकर्म्यांना धडाशिकवण्यासाठी सोपान मोरे यांनी आंदोनाचा इशारा दिला आहे.
साहेब तुमच्या लेकराबाळांना...: मानवी आरोग्यास हानीकारक रसायणयुक्त भेसळीचे दुग्धजन्य खाद्य पदार्थ केक, बर्फी, पेढा, काजू कतली यासह इतर खाद्य पदार्थांचे गेल्या वर्षभरापासून सामान्य नागरिक जेष्ठापासून लहनापर्यंत महिला पुरुष सेवन करत आहेत. भेसळखोरांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करणार्या एफडीए च्या अधिकारी हेच भेसळयुक्त खाद्य पदार्थ स्वता:च्या मुलाबाळांना खाऊ घालतील का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.