भाजपने सत्तागणित जुळवले, काँग्रेसच्या हातून महापालिका गेली;प्रकाश आंबेडकरांनाही धक्का!
- Navnath Yewale
- Jan 24
- 2 min read

अकोला: आकोला महापालिकेत काँग्रेस विरोधी पक्षांनासोबत घेऊन सत्ता स्थापन करेल, अशी शक्यता होती. प्रकाश आंबेडकर यांच्याशी बोलून आपला सत्तेत वाटा नको मात्र भाजपला सत्ता स्थापनेपासून रोखू अशी चर्चा झाली. त्यासाठी आंबेडकर यांच्या निवास्थानी बैठक देखील झाली होती. त्यामुळे भाजप सत्तेपासून दूर रहाणार अशा चर्चा होत्या. मात्र,भाजपने गेम फिरवत मित्र पक्षांना सोबत घेत ‘शहर सुधार आघाडी’ स्थापन करून सत्ता आपल्याकडे राहिल, अशी खेळी केली आहे.
अकोला महानगरपालिकेतील सत्तास्थापनेचे गणित जुळले असून भाजप व मित्रपक्षांची स्थापन होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपच्या नेतृत्वाखाली ‘शहर सुधार आघाडी’ स्थापवन करण्यात आली असून गट स्थापनेसंदर्भातील पत्र अमरावती विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आले आहे.
महापालिकेतील एकून संख्याबळ पाहता भाजपकाडे 38 नगरसेवक आहेत. त्यांना शिंदे गट (1), अजित पवार गट (1), शरद पवार गट (3) व शहर विकास आघाडी (1) यांचे पाठबळ मिळाल्यानेएकून संख्याबळ 44 वर पोहोचले असून स्पष्ट बहूमत पूर्ण झाले आहे.
दरम्यानय, दिवसभर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर, काँग्रेस आमदार साजिद खान पाठाण तसेच ठाकरेंचे आमदार नितीन देशमुख यांच्याकडून सत्तास्थापनेसाठी प्रयत्न सुरू होते. मात्र संध्याकाळी भाजप आमदार रणधीर सावरतकर यांनी “ आमच्याकडे बहूमत असून भाजप व मित्रपक्षांची सत्ता स्थापन होणार आहे” असा दावा माध्यमांशी बोलताना केला. त्यानंतर काही वेळातच ‘शहर सुधार आघाडी’ स्थापन झाल्याचे पत्र सोशल मिडियावर व्हायरल झाले.
या पत्रात भाजप, शरद पवार गट, अजित पवार गट, शिंदे गट व अपक्ष नगरसेवकांचा समावेश असल्याचे नमूद आहे. शहर सुधार आघाडीचे गटनेते म्हणून पवन महल्ले यांची स्वाक्षरी या पत्रावर असून हे पत्र अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात सादर करण्यात आले आहे.
या घडामोडींमुळे काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी व उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नगरसेवकांचे सत्तास्थापनेचे स्वप्न भंग पावल्याचे चित्र आहे. सोमवारी विभागीय आयुक्तांकडून अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर 30 जानेवारी रोजी सत्तास्थापनेचा मुहूर्त होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने मंत्रालयायात 29 महानगरपालिकांसाठी महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत काढली असून आकोला महापालिकेसाठी महापौपद ओबीसी महिलेसाठी राखील सुटले आहे. त्यामुळे शहराला पुन्हा एकदा महिला महापौर मिळाणार हे निश्चित झाले आहे.
आकोला महापालिकेच्या गेल्या दोन दशकांच्या इतिहासावर नजर टाकली असता महापौर पदावर महिलांचे वर्चस्व दिसून येते. सन 2002 ते 2019 या कालावधीत एकूण आठ महापौरांपैकी पाच वेळा महिला महापौरपदी विराजमान झाल्या असून पुरुषांना केवळ तीन वेळाच संधी मिळाली आहे. सन 2002 मध्ये सुमन गावंडे या आकोल्याच्या पहिल्या महिला महापौर ठरल्या होत्या.
महापौरपदाच्या शर्यतीत भाजप नगरसेविका : माधुरी क्षीरसागर, योगिता पावसाळे, वैशाली शेळके, मंजुषा शेळके, पल्लवी मोरे, शिल्पा वरोकर, रश्मी अवचार, निकिता देशमुख, सोनाली अंधारे, शारदा खेडकर, नीतू जगताप, प्राची काकड, कल्पना गोटफोडे
तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून पूजा गावंडे या चर्चेत आहेत. भाजप- मित्रपक्षांची सत्ता स्थापन झाल्यानंतर महापौरपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडते याकडे आता शहराचे लक्ष लागले आहे.



Comments