भाजपमध्ये ये अन्यथा जीवे मारू, अमेरिकेतही मारू अभिजित दिपके यांना जीवे मारण्याची धमकी
- Navnath Yewale
- May 22
- 2 min read

सोशल मीडियात धुमाकूळ घातलेल्या कॉकरोच जनता पार्टीचा
संस्थापक अभिजित दिपकेला आता जीवे मारण्याच्या धमक्या मिळू लागल्या आहेत. व्हॉट्अॅपवर जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत.अभिजितने या संदेशांचे स्क्रीनशॉट एक्स पोस्टवर शेअर केले आहेत. एका संदेशात त्याला भारतीय जनता पक्षात सामील होण्यास किंवा मृत्यूला सामोरे जाण्याची धमकी दिली आहे. यामध्ये अमेरिकेतही मरून टाकू अशी धमकी देण्यात आली आहे. दुसर्या एका संदोशात फोन नंबर मिळाल्यामुळे पत्ता शोधायला वेळ लागणार नाही, असेही म्हटले आहे.
कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांना धमक्या मिळण्याच्या एक दिवस अधीच कॉकरोच जनता पार्टीचे अधिकृत एक्स खाते भारतात कायदेशीर मागणीनुसार बंद करण्यात आले होते. हे खाते सुरू झाल्याच्या अवघ्या पाच दिवसांत बंद झाले. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी बेरोजगार तरुणांची तुलना कॉकरोच आणि परीजीवी यांच्याशी तुलना केल्यामुळे उमटलेल्या प्रतिक्रियेतून या उपरोधिक पक्षाची स्थापना झाली आहे. हा पक्ष स्वत:ला आळशी आणि बेरोजगारांचा आवाज म्हणवतो. अवघ्या पाच दिवसांत या पक्षाचे इन्स्टाग्रामवर 2.1 कोटींहून अधिक फॉलोअर्स मिळवले असून ही संख्या भाजपच्या फॉलोअर्सपेक्षाही जास्त आहे.
दरम्यान, काँग्रेस नेते शशी थरूर,अखिलेश यादव, महुआ मोइत्रा, मनिष सिसोदिया यांसारख्या नेत्यांनी आणि अनुराग कश्यप, कोंकण सेन शर्मा यांसारख्या सेलिब्रिटींनी या चळवळीला किंवा पक्षाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला पाठिंबा दर्शवला आहे. शशी थरूर यांनी पक्षाचे खाते बंद करण्याला चुकीचा निर्णय असल्याचे म्हटले आहे.
निट घोटाळ्यानंतर ‘कॉकरोच जनता पार्टी या उपरोधिक मोहिमेचे संस्थापक अभिजित दिपकेनं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या नाजीनाम्याची मागणी करणारी याचिका सुरू केली आहे. शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींमुळे आणि नीट परीक्षेतील गोंधळामुळे 22 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असून काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचा अरोप अभिजितने केला आहे. या मोहिमेला तरुणांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. वाढलेल्या लोकप्रियतेमुळे पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपकेच्या आई-वडिलांना मोठी चिता वाटत आहे. आपला मुलगा अडचणीत येऊ शकतो आणि त्याला अटकही होऊ शकते अशी भीतीत्यांना वाटत आहे. अभिजितचे आई- वडिल, भगवान आणि अनिता दिपके छत्रपती संभाजीगरला राहतात.



Comments