top of page

भारतविरोधी अजेंडा राबवत , ढाक कबीज करण्याचे पाक-चीनचे षडयंत्र!

बांगलादेशात 12 फेब्रूवारी रोजी पंतप्रधानपदासाठी मतदान होणार आहे. ही जमात-ए-इस्लामी आणि बांग्लादेश नॅशनलिस्ट पार्टी यांच्यात थेट स्पर्धा आहे. शेख हसीना यांचा पक्ष अवामी लीग यावर बंदी घालण्यात आली आहे, त्यामुळे यावेळी निवडणुकीत त्यांचे नेते कमी दिसतील. खालिदा झिया यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र तारिक रहमान यांनी बीएनपीचे नेतृत्व हाती घेतले आहे आणि ते पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार देखील आहेत.


दुसरीकडे, जमात-ए-इस्लामीचा चेहरा अमीर शफीकुर रहमान आणि पक्षाचे सरचिटणीस, मिया गुूलाम परवार आहेत. इस्लामी आंदोलन बांगलादेश (आयएबी) सारखे छोटे पक्ष देखील निवडणुकीत भाग घेत आहेत. या निवडणुकीत प्रत्येक पक्ष आणि त्यांच्या नेत्यांनी भारताबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.


तज्ज्ञांच्या मते, जर जेआयबी निवडणूक जिंकली तर भारत राजकीय आणि सुरक्षा दोन्ही दृष्टिकोनातून चिंचेत पडेल. त्याच वेळी बीएनपीच्या नेतृत्वाखालील सरकार भारतासाठी तुलनेने “ आरामदायक ” ठरेल. त्यांनी स्पष्ट केले की, सध्याची बीएनपी जमातशी युती करत नाही आणि पक्षाने भारताशी संवाद साधण्याची इच्छा व्यक्त केली आहे.


तज्ञांचे म्हणणे आहे की, भारत बांगलादेशशी तुटलेले संबंध दुरुस्त करण्यास तयार असेल. जरी भारताला अवामी लीग सत्तेत राहावे असे वाटत असेल तरी, आता ते ओळखते की अवामी लीग आता एक प्रभावी राजकीय शक्ती राहणार नाही. म्हणूनच भारत बीएनपीच्या नेतृत्वाखालील सरकार स्वीकारण्यास आणि त्यांच्यासोबत काम करण्यास तयार आहे.


मतदान सर्वेक्षण जमात आणि बीएनपीमध्ये जवळची स्पर्धा दर्शवितात. म्हणून भारत दोन्ही पक्षांनी संपर्क राखत आहे. या महिन्यात, जमातचे प्रमुख शफीकुर रहमान यांनी खुलासा केला की, डिसेंबरमध्ये एका भारतीय राजदुताने त्यांची भेट घेतली. दरम्यान, ढाक्यातील भारतीय उच्चायुक्त प्रणय वर्मा यांनी 10 जानेवारी रोजी बीएनपी नेते तारिक रहमान यांची भेट घेतली होती.


शेख हसीना यांना सत्तेवरून काढून टाकल्यानंतर, पाकिस्तान आणि बांगलादेशमधील संबंध वेगाने सुधारले आहेत.2024 मध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान शाहाबाज शरीफ यांनी अंतरिम नेते युनूस यांची दोनदा भेट घेतली. सप्टेंबर 2024 मध्ये , पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी 1971 पासून ताणलेले संबंध “ पुनरुज्जीवीत ” करण्याच्या उद्देशाने ढाक्याला भेट दिली.


दराम्यान, निवडणुकांदरम्यान, मते मिळविण्यासाइी भारताविरुद्ध तीक्ष्ण आणि भावनिक वक्तृत्व वापरणे सोपे आहे, मात्र, सत्तेत आल्यांनतर तेच पक्ष शक्तिशाली आणि प्रभावशाली शेजार्‍याशी व्यवहार करताना त्यांची लोकप्रिय भूमिका बदलतात.त्यांच्या मते, सत्तेची जबाबदारी घेऊन आदर्शवाद व्यावहारिक राजकारणाला मार्ग देतो.


1947 मध्ये भारत- पाकिस्तान फाळणीनंतर पाकिस्तानचे दोन भाग झाले. ज्यामध्ये पूर्व पाकिस्तान आजचा बांग्लादेश बनला. 1971 मध्ये भारताच्या पाठिंब्याने बांग्लादेशला स्वातंत्र्य मिळाले. या काळात पाकिस्तानी सैन्यावर अत्याचार, लाखो लोकांचे बळी आणि सुमारे 200,000 महिलांवर बलात्कार केल्याचा आरोप होता. बांग्लादेश अजूनही पाकिस्तानकडून औपचारिक माफी मागतो.


विश्लेषकांच्या मते, युनूसचवे अंतरिम सरकार पाकिस्तानशी आर्थिक संबंध वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. फेब्रूवारीमध्ये, दोन्ही देशांनी 1971 नंतर पहिल्यांदा थेट व्यापार पुन्हा सुरू केला. गेल्या आठवड्यात,14 वर्षानंतर थेट उड्डाणे देखील पुन्हा सुरू करण्यात आली, जी सुरक्षेच्या कारणास्तव 2012 मध्ये बंद करण्यात आली होती.

Comments


bottom of page