भारताचे फायटर जेट सुखोई रडावरून गायब, पायलट बेपत्ता; आसाममध्ये विशेष पथक रात्रीच जंगलात ‘सर्च ऑपरेशन’
- Navnath Yewale
- Mar 5
- 1 min read

आसाममधील कार्बी आंगलोंग जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळी 7:00 वाजाता भारतीय वायुसेनेचे सुखोई एसयू- 30 एमकेआय विमान रडावरून गायब झाल्याची धक्कादायक माहिती नरेंगी येथील संरक्षण जनसंपर्क अधिकार्यांनी दिली आहे.
विमानातील एक फायटर पायलट बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. घटनेचे नेमके कारण शोधण्यासाठी आणि पायलटचा शोध घेण्यासाठी संरक्षण दलाचे शोध पथक घटनास्थळी पाठवण्यात आले आहे. संरक्षण दलाच्या शोध पथकाने आसामच्या जंगलात रात्रीच ‘सर्च ऑपरेशन’ सुरू केले आहे.



Comments