भोंदूबाबा खरातच्या बातमीवरुन रुपाली चाकणकरांची पत्रकारास धमकी ! एका वर्षापूर्वी आहिल्यानगरच्या पत्रकाराकडून माफीनामा घेतला; ‘सु-मोटो’ गुन्ह्यासाठी श्रीरामपूर पोलिसांना पत्र दिल्याचाही दावा

आहिल्यानगर : नाशिक महिला अत्याचार प्रकरणात स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू अशोक उर्फ कॅप्टन खरात याला अटक झाल्याने त्याच्यासोबत असलेल्या अनेकांचे धाबे दणाणले आहेत. कॅप्टन अशोक खरात याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत आणि होणार्या आरोपांबाबत माहित नसल्याचे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या. मात्र, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी रुपाली चाकरणकर यांच्याकडून भोंदूबाबा खरात याच्या डोक्यावर छत्री पकडल्याच्या फोटोसह रुपाली चाकणकर यांच्याकडून खरातच्या पाद्यपुजनाचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला.
त्यातच वर्षभरापूर्वी खरातच्या काळ्या कृत्याची चाहूल लागल्यानंतर त्याची कुंडली बाहेर काढलेल्या पत्रकाराला चाकणकर यांनी वर्षभरापूर्वी धमकीचा फोन केला होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. माफी मागा नाहीतर पोलिसांना गुन्हा दाखल करायला लावते, अशी धमकी चाकरणकरांनी दिल्याचे स्थानिक पत्रकाराने सांगितले. स्थानिक पत्रकाराच्या दाव्याने रुपाली चाकणकरांच्या आडचणीत वाढ झाली आहे.
नाशिक महिला अत्याचार प्रकरणात स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू अशोक उर्फ कॅप्टन खरात याला अटक झाल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे खरात याच्या सोबतचे अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. यावरुन आता विरोधकांनी टीकेची झोड उठवली असून चाकणकरांकरांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. एक वर्षापूर्वीच निनावी छापलेल्या बातमीमध्ये चाकणकरांनी संबधित संपादकाला फोन करून माफी मागायला लावली होती. त्यामुळे चाकणकर यांना खरंच अशोक खरातचे काळे कारनामे माहित नव्हते का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. एक वर्षापूर्वी नेमकं काय घडलं होतं? याबाबत पत्रकार दत्तात्रेय खेमनकर यांनी सांगितले आहे.
दरम्यान एका वर्षापूर्वी आहिल्यानगर येथील एका स्थानिक वृत्तपत्रात, थेट नाव न घेता ‘ कॅप्टन भोंदुबाबा याच्याकडून महिलांचे लैंगिक शोषण’ या मथळ्याखाली वृत्त छापून आले होते. त्यावेळी अशोक खरात याच्या विरोधात बातमी लावताच महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी थेट पत्रकार दत्तात्रय खेमनकर यांना फोन केला. माफी मागा अन्यथा गुन्हा दाखल करायला लावते, अशी धमकीच रुपाली चाकणकर यांनी दिल्याचा अरोप खेमनर यांनी केला आहे. महिला आयोगाकडून ‘स्यू-मोटो’ गुन्हा दाखल करण्यासाठी चाकणकर यांनी पोलिस स्टेशनला पत्र दिल्याचा दावाही खेमनर यांनी केला आहे.
दरम्यान , अशोक खरात याने पाच कोटींच्या अब्रूनुकसानीची नोटीसही पाठवली होती. तर महिला अयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी देखील खेमनर यांना फोन करून माफीनामा सादर रकण्यास सांगितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
भोंदू बाबा खरातच्या काळ्या कृत्याची आमच्याकडे माहिती आली होती. त्याआधारे आम्ही बातमी केली होती. अन्यायाविरोधात लढताना खरे तर आम्हाला त्यांनी साथ देणे गरजेचे होते. मात्र त्यांनी आमचा आवाज दाबवण्याचा प्रयत्न केला. पत्रकारांचा आवाज दाबून त्यांनी खरातला पाठीशी घातले. श्रीरामपूर पोलिस स्टेशनला त्यांनी माझ्यावर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात पत्र दिले होते, अशी धक्कादायक माहिती पत्रकार संपादक दत्तात्रेय खेमनर यांनी दिली आहे.



Comments