top of page

मतदार याद्यांतील घोळ मान्य करत फडणवीसांनी काँग्रेसला घेरलंथेट इशारा म्हणाले त्यांचे आमदार खासदार...!

ree

देशभरात सध्या मतचोरी आणि मतदार याद्यांच्या घोळाचा मुद्दा चांगलाच तापला आहे . काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे थेेट मतचारीचा आरोप भाजपवर करत आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मतदार याद्यांमधील घोळ दुरुस्त केल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नका अशी मागणी केली आहे. काँग्रेसने मतदार याद्यांच्या पडताळीसाठी एक समिती नेमली आहे. यातून दुबार नावांचे प्रकारही समोर आले आहेत. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचे मान्य केले आहे.


मात्र याचा अर्थ दुबार नावे असलेल्या मतदारांनी एकाच निवडणुकीत वेगवेगळ्या ठिकाणी मतदान केले असा होत नाही. असे सांगून त्यांनी मतचोरीचा आरोप फेटाळून लावला. दुबार नावांमुळे आम्ही निवडुन आलो या आरोपांवर विरोधक ठाम असतील तर ते त्यांनासुद्धा लागू होतात याकडे त्यांनी लक्ष वेधल.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी रामगिरीवर पत्रकारांसोबत संवाद साधला. या दरम्यान त्यांनी विरोधकांच्या मतचोरीचे आरोप आणि मतदार याद्यांमधील घोळावरही भाष्य केले. मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचे त्यांनी मान्य केले ते म्हणाले हा घोळ आजचा नाही. वर्षानुवर्षापासून सुरू आहे. आपण या विरोधात 2012 साली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र त्याचा निकाल अद्याप लागलेला नाही.


मतदान नोंदणी आणि मतदार याद्यांमधून नाव काढण्याची एक पद्धत आहे. त्यासाठी वेगवेळे फॉर्म भरावे लागतात. मतदार यादीतून नाव वगळण्याच्या भानगडीत कोणी पडत नाही, थेट सहा नंबरचा फॉर्म भरुन मतदार आपली नावे नोंदवतात. शहरांमध्ये वेगवेगळ्या गावांमधून लोक नोकरी व कामानिमित्त स्थायिक झाले असतात. त्यांची नावे मूळ गावातील मतदार याद्यांमध्ये कायम असते. ज्या ठिकाणी स्थायिक झाले तेथेही ते नोंदणी करतात.


शहरामध्ये भाड्याने राहणारे घरेसुद्धा बदलवत असतात. ते जिथे वास्तव्यास जाता त्या भागातील मतदार याद्यामध्ये आपली नावे नोंदवतात. त्यामुळे एकाच मतदाराचे नावे वेगवेगळ्या ठिकाणी मतदान करत नाही. याचा काही निवडणुकीच्या निकालावर परिणाम होत नाही. फक्त मतदानाच्या टक्केवारीवर होतो असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.


हा घोळ ग्रामीण भागात फारसा दिसत नाही. गावची लोकसंख्या कमी असते. कोण आला आणि गेला याची माहिती प्रत्येकाला असते आम्ही निवडुन आलो तर मतचोरी केली असे आरोप केले जातात विरोध निवडुन आले तर आम्हीसुद्धा हेच आरोप करायचे का असा सवालही फडणवीस यांनी केला. काँग्रेसचे आमदार, खासदार निवडुन आले त्या मतदारसंघातील मतदार याद्यांमध्येसुद्धा दुबार नावे आहेत. त्यासुद्धा आमच्याकडे आहेत.योग्य वेळी त्या समोर आणल्या जातील. या मतदार याद्यांमध्यील घोळामुळेच विरोधक निवडून, असे आम्ही म्हणायचे का? असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Comments


bottom of page