महाराष्ट्राच्या राजकारणात महाविकास आघाडीचा ‘लेटर बॉम्ब ’!
- Navnath Yewale
- Aug 12
- 2 min read
भाजपने 13 मतदारसंघ चोरल्याचा आरोप, तिन सह्यांनी खळबळ

काँग्रेसचे नेते तथा लोकसभेतीचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ‘मत चोरी’ चा दावा करत काही दिवसापूर्वी मतदार याद्यांमधील गोंधळबाद्दल धक्कादायक खुलासे केले. यावेळी त्यांनी भारतीय जनता पार्टीने निवडणुकीमध्ये फेरफार केल्याचा गंभीर आरोप केला. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मतदतीने ही मत चोरल्याचा आरोप राहुल गांधींनी केल्यानंतर देशभरात एकच खळबळ उडाली. यावरून सोमवारी दिल्लीत विरोधी पक्षाच्या खासदारांनी निवडणूक अयोगाच्या कार्यालयावर मोर्चाही नेला. एकीकडे हा विषय राष्ट्रीय स्तरावर तापलेला असतानाच आता राज्यातील महाविकास आघाडीनेही विधानसभा मतदानाआधी मतदार यांद्यांमध्ये छेडछाड करण्यात आल्याचा आरोप केला आहे.
विधानसभा निकालांच्या आधीच महाविकास आघाडीने निवडणूक अयोगाला या संभाव्य छेडछाडीसंदर्भातील आक्षेप नोंदपणारं पत्र लिहिलं होतं. महाविकास आघाडीने भाजपवर गंभीर आरोप करणारे पत्र पाठवलं होतं त्यावर मविआच्या तीन प्रमुख नेत्यांच्या स्वाक्षर्या आहेत. मतदार याद्यांमध्ये छेडछेड करण्यासाठी भाजपकउे फॉर्म 6 चा डेटाबेस देखील उपलब्ध होता असा आरोप करण्यात आला आहे.
“ भाजपच्या पदाधिकारी आणि आमदारांनी मतदारयादीत छेडछाड करताना आपल्या बाजूने मतदान करू शकतील असे लोक आधीच हेरले होते. आपल्या बाजून मतदान करू शकरणारी नावे हिरव्या शाईने ठळक केली तर बाजूने मतदान न करणारी लाल रंगात ठळक करण्यात आली होती. आणि ती यादी थेट एका खासगी सर्व्हरवर अपलोड करण्यात आली. त्यानंतर मोबाई अॅप्लिकेशनमध्ये अपलोड करण्यात आली” असं या पत्रात नमुद करण्यात आलं आहे.
याच यंत्रणेमुळ—— त्यांना आवश्यक असणारी मतदारांची नावे मतदार याद्यात राहिली आणि बाकी नावे आपोआप ढिलीट झाली. केलेले बदल कुणाच्याही लक्षात येऊ नये म्हणून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सुमारे 10 हजार नावे वाढवण्यात आली. वाढवण्यात आलेली नाव ही पूर्णपणे बनावट आणि फसवी होती” असा पत्राद्वारे आरोप करण्यात आला होता.
या पत्रावर उद्धव ठाकरे शिवसेनेकडून खासदार संजय राऊत, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून तत्कालीन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील अणि काँग्रेसकडनू तत्कालीन प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची स्वाक्षरी आहे.
महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी हे पत्र ऑक्टोबर महिन्यात लिहिले होते. महाविकास आघाडीकडून संशय असणार्या मतदारसंघाची मतदार याद्यांची माहिती नविडणूक अयोगाकडून मागण्यात आली होती. मात्र आजपर्यंत ही माहिती देण्यात आलेली नाही. महाविकास आघाडीने महाराष्ट्रातील कोणत्या विधानसभा मतदारसंघाबद्दल त्यांना शंका आहे याची चादीच जारी केली आहे ज्यामध्ये शिर्डी, चंद्रपूर, आर्वी, कामठी, कोथरूड, गोंदिया, अकोला पूर्व, चिखली, नागपूर, कणकवली, खामगाव, चिमूर, धामनगाव रेल्वे या विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे.
काँग्रसेचे नेते राहुल गांधी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मदतीने भारतीय जनता पक्षाने ( भाजपा) मतदार यादीत छेडछाड करून ‘ मत चोरी ’ केल्याचा गंभीर आरोप केला आहे. यानंतर महाविकास आघाडीनेही (मविआ) राज्यातील मतदार यादीत छेडछाड झाल्याचा दावा केला आहे.
राहुल गांधी आणि महाविकास आघाडीने असा दावा केला आहे की, भाजपाने मतदार यादीत फेरफार करून बनावट आणि फसवी नावे समाविष्ठ केली. यामुळे त्यांच्या बाजूने मतदान करणारी नावे यादीत राहिली, तर इतर नावे हटवली गेली.
महाविकास आघाडीने ऑक्टोबर 2024 मध्ये निवडणूक आयोगाला पत्र लिहून मतदार यादीतील संभाव्य छेडछाडीबाबत आक्षेप नोंदवला. त्यांनी संशयास्पद मतदारसंघांच्या मतदार यादींची माहिती मागितली. परंतु निवडणूक आयोगाने ही माहिती अद्याप दिलेली नाही.
महाविकास आघाडीच्या पत्रात असा आरोप आहे की, भाजपकाडे मतदार यादीत बदल करण्यासाठी फॉर्म 6 (नवीन मतदार नोंदणीसाठी फॉर्म) चा डेटाबेस उपलब्ध होता, ज्याचा वापर करून त्यांनी मतदार यादीत हेराफेरी केली.


Comments