महाराष्ट्रातही छेाट्याशा घरात 119 मतदार!
- Navnath Yewale
- Aug 12
- 1 min read
चंद्रपुर जिल्ह्यातील घुग्गुस गावाच्या निवडणूक आयोगाच्या मतदार यादीतील प्रकार उघड करत काँग्रेसने निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

चंद्रपुर: जिल्ह्यातील घुग्गुस गावात मतदार यादीत मोठा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने केला आहे. गावातील सचिन बांदुरकर यांचे 350 क्रमांकाचे घर प्रत्यक्षात लहान असून, येथे केवळ दोनच मतदार राहतात. मात्र, निवडणूक अयोगाच्या मतदार यादीत या घराच्या पत्त्यावर तब्बल 119 मतदारांची नोंद असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात येत आहे.
दरम्यान, काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकार्यांनी आयोगाच्या यादीनुसार पडताळणी केली असता हा प्रकार समोर आला आहे. एका लहान घरात एवढ्या मोठ्या संख्येने मतदारांची नोंदणी कशी झाली, असा सवाल काँग्रेस पदाधिकार्यांनी व्यक्त केला आहे. या घोटाळ्यामुळे गावासह राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
काँग्रेस पदाधिकार्यांच्या पडताळणीत काय?
घुग्गुस गावातील 350 क्रमांकाच्या घरात प्रत्यक्षात फक्त दोनच रहिवासी, मतदार यादीत त्याच पत्त्यावर तब्बल 119 मतदारांची नोंद, काँग्रेसचा निवडणूक अयोगावर गंभीर अनियमिततेचा आरोप, प्रकरणामुळे गावासह राज्याच्या राजकाणात खळबळ.


Comments