महाराष्ट्रातील नाशिमध्ये ‘मत चोरी’ चं कांड!
- Navnath Yewale
- Aug 13
- 1 min read
ठाकरे गटाच्या नेत्याचा दावा; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकापूर्वीच समोर आला धक्कादायक प्रकार

‘मत चोरी’ वरून राहुल गांधी यांनी निवडणूक अयोगावर हल्लाबोल केला आहे. कर्नाटक मधील मत चोरी प्रकरणा नंतर आता महाराष्ट्रातही बोगस मतदार, मत चोरीची प्रकरणं समोर येत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांपूर्वीच मोठं काड समोर आलं आहे. मतदार यादीतील या घोळामुळे राज्यीरात खळबळ उडाली आहे.
नशिक: काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहे. लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुकीतील मोठ्या प्रमाणावरील बोगस मतदारांवरून राहुल गांधींनी निवडणूक अयोगावर हल्लाबोल केला. त्यांनतर आता राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वीच मतदार याद्यातील मोठं घोळ समोर आला आहे.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर नाशिकमध्ये अनेक बनावट मतदार ओळखपत्रं आढळल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी योगेश गांगुर्डे यांनी हा भांडफोड केला आहे. यामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
दरम्यान, गांगुर्डे यांच्या माहितीनुसार एका व्यक्तीच्या नावावर तब्बल तीन वेगवेगळे मतदार ओळपत्र निघाले आहेत. काही प्रकरणांत एकाच व्यक्तीचा फोटो असूनही त्यावर वेगवेगळी नावे छाप्णात आली आहेत. एवढेच नव्हे, तर एका ओळपत्रावर नाव महिलेचे असतना त्यावरचा फोटो पुरुषाचा असल्याचा प्रकारही समोर आला आहे.
अशा प्रकारे अनेक बनावट व विसंगत ओळपत्रांचे वितरण झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. हे पुरावे लवकरच निवडणूक आयोगाकउे सादर केले जाणार असल्याची माहिती गांगुर्डे यांनी दिली. संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून अशा बनावट कार्ड तयार करणार्या अधिकार्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. निवडणुक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि प्रमाणिकपणासाठी अशा प्रकारच्या फसवणुकी बाबत कठोर पावलं उचण्याची गरज असल्याचे गांगुर्डे म्हणाले. या प्रकरणामुळे नाशिक जिल्ह्यात राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे,तर नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
Comments