राजीनामा देण्यास नकार देणार्या ममता बॅनर्जींना राज्य पालांकडून धक्का विधानसभाच बरखास्त
- Navnath Yewale
- May 7
- 1 min read

ममता बॅनर्जी यांनी राजनामा देण्यास नकार दिल्यानंतर राज्यपालांनी पश्चिम बंगालमधील सर्व मंत्रिमंडळ बरखास्त केले आहे. बंगाल निवडणुकीतील दारुण पराभवानंतर ममता बॅनर्जी यांनी राजनामा देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्यांनी दावा केला होता की आम्ही ही निवडणुक हारलो नसून आमची लढाई ही निवडणूक आयोगासोबत होती. मात्र एसआयआरच्या माध्यमातून 90 लाख मतं वगळली गेली. यामुळे आमचा हा पराभव मान्य नाही. यानंतर राज्यपाल आर एन रवी यांनी हा निर्णय घेतला.
ममता बॅनर्जी यांनी असाही आरोप केला की, तृणमूल काँग्रेसने भाजपविरोधात निवडणूक लढवली नाही. उलट भाजपासाठी काम करणार्या निवडणूक अयोगाशीच संघर्ष केला. त्या म्हणल्या माझ्या राजनाम्याचा प्रश्नच एद्भवत नाही, कारण आमचा पराभव जनतेच्या कौलामुळे झाला नाही तर एका षडयंत्रामुळे झाला आहे. मी हरलेली नाही आणि मी लोकभवनात जाणार नाही. सुमारे 100 जागांवर मत चोरी करण्यात आले असा आरोप त्यांनी केला.
बंगालमधील पराभवानंतर ममता बॅनर्जी यांनी सांगितले की, त्या आता राष्ट्रीय स्तरावर विरोधी आघाडी मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करतील. त्या म्हणाल्या इंडिया आघाडीच्या नेत्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी मला फोन केला. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनीही माझ्याशी संवाद साधला.
पश्चिम बंगालमधील पहिल्या भाजप सरकारचा शपविधी सोहळा 9 मे रोजी कोलकत्ता येथील ब्रिगेड परेड मैदानावर होणार आहे. मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात येणार असून सुमारे 400 पोलीस कर्मचारी तैनात असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह संरक्षण मंत्री राजनाथसिंह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन आणि भाजपशासित अनेक राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित राहण्याची शक्यता आहे.



Comments