राज्य सरकारचा अतिवृष्टी मदतीचा सुधारीत जीआर जारी
- Navnath Yewale
- Oct 10
- 1 min read
राज्यातील 347 तालुक्यांचा समावेश; डोंगरग्रस्त भागातील घरांना 10 हजार तर दुकानांना 50 हजार रुपयांची मदत जाहिर

राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकर्यांसाठी पॅकेज जाहीर केलं. शेतकर्यांना 31 हजार 628 कोटी रुपयांचं पॅकेज देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी 7 ऑक्टोबर रोजी केली. राज्यातील 347 तालुक्यांना सरकारनं भरघोस मदत केली आहे. नुकसानग्रस्त शेतकर्यांना सरसकट मदत दिली जाणार आहे. मुख्यमंत्र्यांनी डोंगरी भागातील नुकसानग्रस्त घरांना 10 हजार रुपये अधिकची मदत तर दुकानांना 50 हजार रुपयांपर्यंतची मदत देण्यात येणार आहे.
अतिवृष्टीच्या महापुराने शेतातील जमीन खरडून गेलेली आहे. त्यासाठीही सरकारनं मदत जाहीर केली आहे. त्यासाठी 47 हजार रुपये हेक्टरी भरपाई देणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणालेत. तसेच प्रति विहिर 30 हजार रुपयांची मदतही देणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणालेत. अतिवृष्टी होऊन पूर आपत्ती परिस्थिती उद्भवलेली आहे. राज्यातील 34 जिल्ह्यातील 347 तालुक्यांमधील शेतकर्यांचे शेती पीक आणि शेतजमीन यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.
जनावरे दगावणे, मनुष्य हानी होणे, घर पडझड होणे, पुरामुळे गावातील बाधितांना स्थलांतरीत करणे याबाबत मदत देण्याबाबतची कार्यवाही करण्याता येत आहे. कृषी विभागामार्फत राज्यामध्ये नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहेत. त्यानुसार जून 2025 ते ऑगस्ट 2025 या कालावधीत 26.69 लाख हेक्टर क्षेत्राचे तर सप्टेंबर 2025 या महिन्यात जवळ जवळ 39 लाख हेक्टर क्षेत्रावरील एकून सुमारे 65 लाख हेक्टर क्षेत्रातील शेतीपिकांचे नुकसान झाले आहे.
महाराष्ट्रात 1 कोटी 43 लाख 52 हजार 281 हेक्टर जमिनीवर पिकांची लागवड झाली होती. यापैकी साधारण 65 लाख हेक्टर जमिनीवरील पिकांचं नुकसान झालं आहे. दरम्यान क्षेत्र आणि पिकांची स्थिती या सर्व घटकांचा एकत्रित विचार करून प्रभावित झालेले तालुके सोबतच्या परिशिष्टानुसार आपत्तीग्रस्त घोषित करण्यात आले आहेत.



Comments