राज्यातील मतदान प्रक्रियेत धक्कादायक प्रकार; ईव्हीएम मशीनच फोडल्या !
- Navnath Yewale
- Dec 2
- 1 min read

राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी मतदान पार पडले. निवडणुकीत धक्कादायक प्रकार घडला आहे. काही जिल्ह्यांमध्ये ईव्हीएम मशिन फोडल्या आहेत. ज्या केंद्रावर या मशीन फोडल्या आहेत तेथील मतदारांचे काय होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे या ठिकाणी तणावाचे वातावरण होते. सर्वच मतदान केंद्रावर सुरक्षा वाढवण्यात आली.
अकलुज नगरपालिका निवडणुक प्रभाग 7 मध्ये उमदवाराच्या नवन्याने ईव्हिएम मशिन फोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मतदान करताना बटण दाबत नसल्याने उमेदवाराच्या नवर्याने कृत्य केले. काही वेळानंतर ईव्हीएम मशीन बदलून मतदान प्रक्रिया सुरळीत झाल्याचं पाहायाल मिळालं.
गडचांदूर येथे मदानादरम्यान एका मतदाराने ईव्हीएम फोडले: प्रभाग क्रमांक 9 मधील आदर्श हिंदी सेमी इंग्लिश प्राथमिक विद्यालय येथील मतदान केंद्रावर हा प्रकार घडला. राम दुर्गे असे ईव्हीएम फोडणार्या मतदाराचे नांव आहे. “नगारा”या चिन्हा समोरील बटन दाबल्यावर कमळाचा लाईट लागत असल्याचा आरोप ईव्हीएम फोडणार्या मतदाराने केला. पोलिसांनी राम दुर्गे याला ताब्यात घेतले. यानंतर नवीन ईव्हीएम लावून मतदान घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
हिंगोलीच्या कळनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी लोकशाहीवरच नांगर फिरवल्याचं पाहायला मिळालं. संतोष बांगर यांनी मतदान करताना मतदान केंद्रात ईव्हीएम मशीनजवळ उभं राहून घोषणाबाजी केली. ज्या मतदान केंद्रावर मोबाईल घेऊन जायला परवानगी नाही, त्या मतदान केंद्रात संतोष बांगर चक्क मोबाईल घेऊन गेले. एवढ्यावरच हे थांबले नाहीत, त्यांनी ईव्हीएम मशीनसमोर मोबाईल कॅमेराही सुरू केला. संताष बांगर मतदान करताना त्यांच्या कार्यकर्त्यांचा गराडाही पडला होता. कार्यकर्त्यांनीही मोबाईल कॅमेरे सुरू ठेवले होते. एवढं कमी की काय संताष बांगर यांनी ईव्हीएमजवळ घोषणाबाजीही केली. हा सगळा प्रकार केल्यावर,नियमांचं उल्लंघन केल्यानंतरही संतोष बांगर यांनी त्यांच्याजवळ उभ्या असलेल्या महिला मतदाराला मतदानाबाबत विचारायला सुरुवात केली. या प्रकरणी संतोष बांगर यांच्यावर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



Comments