top of page

राम खाडे हल्ला प्रकरण : आमदार धसांची ब्रेनमॅपिंग, नार्कोटेस्ट करा - महेबूब शेख

प्रकरणाची एसआयटी चौकशी, मास्टरमाईंड शोधण्याची मागणी

ree

बीड: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते राम खाडे यांच्यावर बीड-आहिल्यानगर समीवेर मांदळी (दि.26) रोजी सायंकाळी गावाजवळ अज्ञात हल्लेखोनांनी प्राणघातक हल्ला केला. याहल्ल्यामध्ये राम खाडे गंभीर जखमी झाले असून पुणे येथील एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हल्लेखोरांनी खाडे यांच्यावर सशस्त्र हल्ला चढवत त्यांची इनोव्हा गाडी फोडली. याशिवाय सोबत असलेल्या तीन ते चार लोकांवरही हल्ला केला.


राम खाडे यांच्यावरील प्राणघातक हल्ला प्रकरणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी घटनेच्या दिवशीच सोशल मिडियाच्या फेसबुक आयडीवर पोस्ट करत घटनेचा निषेध केला. भाजपचे आमदार सुरेश धस यांचे नांव घेत महेबूब शेख यांनी राम खाडे यांच्यावरील हल्ला पूर्वनियोजीत कटाचा भाग आहे. राम खाडे यांनी कोणाचे घोटाळे बाहेर काढले, आष्टीतील शॉपिंगमॉल बांधकामाला ‘स्टे’ आला आणि राम खाडे यांच्यार हल्ला करण्यात आल्याचा आरोप केला होता.

यावर आमदार सुरेश धस यांनी राम खाडे यांच्यावरील हल्याची आपणास कल्पना नाही. कुठं कोणाचं भांडण झालं, काय झालं हे अपणास माहित नाही. हा केवळ हस्यास्पद प्रकार आहे. आण उठसूट कोणत्याही लोकप्रतिनिधीवर बेछूट आरोप करयाचे हे चांगलं नाही. या हल्ल्याची योग्य चौकशी व्हावी, मी कुठल्याही चौकशीला सामोरं जाण्यास तयार असल्याचंही आमदार धस म्हणाले होते.


राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी आमदार धस यांच्यावर जोरदार पलटवार केला. माध्यमांशी बोलताना महेबूब शेख म्हणाले की, रमा खाडे यांनी कोणाच्या जमीनीचे घोटाळे बाहेर काढले होते. राम खाडे यांच्या याचिकेमुळेच सुरेश धस यांच्यासह कुटुंबावर गुन्हे दाखल झाला ना, सुप्रीम कोर्टापर्यंत गेले होते.आम्ही कुठं म्हणलोय, आम्ही तर म्हणतोय चौकशी झाली पाहिजे त्याचा मास्टरमाईंड समोर आला पाहिजे. राम खाडेना कोणी मारलय, का मारलयं करा ब्रेनमॅपिंग, मग सुरेश धसांची मागणी असेल तर त्यांचीही नार्कोटेस्ट करा, राम खाडेची पण करा. बघू कोणी हल्ला केला त्यांच्यावर जर ते एवढे दोषी नसतील तर त्यांनी आंगावर घ्यायचं काही कारण नाही म्हणत महेबूब शेख यांनी आमदार धसांची ब्रेनमॅपिंग, नार्कोटेस्टची मागणी केली.

Comments


bottom of page