राष्ट्रपती भवनात भारताच्या 53 व्या सरन्यायाधीशांनी घेतली शपथ!
- Navnath Yewale
- 6 days ago
- 2 min read
माजी सरन्यायाधीश गवई यांना मारली मिठी, माजी सरन्यायाधीश गवई यांनी त्यांची अधिकृत गाडी नविन सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यासाठी सोडली.

नवी दिल्ली: न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आज राष्ट्रपती भवनात भारताचे 53 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. त्यांच्या शपथविधीचे खास वैशिष्ट्ये म्हणजे त्यांनी हिंदीमध्ये शपथ घेतली. उपराष्ट्रपती सी.पी.राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह आणि आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा उपस्थित होते. माजी सरन्यायाधीश बी.आर. गवई, माजी राष्ट्रपती रामनाथ कोवविंद, माजी उपराष्ट्रपती जगदीप धनकखड आणि अनेक केंद्रीय मंत्र्यांसह अनेक मान्यवर शपथविधी समारंभाला उपस्थित होते. सरन्यायाधीश सुर्यकांत यांचा कार्यकाळ 9 फेब्रूवारी 2027 पर्यंत राहील.

शपथविधी समारंभानंतर, माजी सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी एक नवीन आदर्श प्रस्थापित केला. समारंभानंतर त्यांनी त्यांचे उत्तराधिकारी न्यायमूर्ती सुूर्यकांत यांच्यासाठी राष्ट्रपती भवन संकुलात त्यांची अधिकृत कार सोडली. एएनआय नुसार, माजी सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी मुख्य न्यायाधीश असताना त्यांना देण्यात आलेल्या अधिकृत कारमध्ये प्रवास न करून एक ऐतिहासिक आदर्श प्रस्थापित केला. त्याऐवजी, शपथविधी समारंभानंतर, न्यायमूर्ती गवई यांनी राष्ट्रपती भवनात मुख्य न्यायाधीशांसाठी असलेली कार सोडली, ज्यामुळे नवीन सरन्यायाधीशांना सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी अधिकृत कार उपलब्ध होईल याची खात्री झाली.

सरन्यायाधीश सूर्यकांत शपथविधी सोहळा ऐतिहासिक होता,कारण त्यात 6 देशांचे मुख्य न्यायाधीश आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश उपस्थित होते, भूतान, केनिया, मलेशिया, मॉरिशस, नेपाळ आणि श्रीलंका. भारतीय सरन्यायाधीशांच्या शपविधी सोहळ्याला इतक्या मोठ्या संख्येने परदेशी न्यायिक शिष्टमंडळ उपस्थित राहण्याची ही पहिलीच वेळ आहे. शपथविधी सोहळ्यानंतर, भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सर्वोच्च न्यायालयात महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.
दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सोमवारी सांगितले की, भारताचे 56 वे सन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकां यांचे पदभार स्वीकारणे न्यायव्यवस्थेसाठी एका महत्वाच्या वेळी येत आहे. त्यांनी विश्वास व्यक्त केला की न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखाली, संवैधानिक मूल्यांवर आणि कायद्याच्या राज्यावर जनतेचा विश्वास मजबूत होईल. जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा काढून टाकण्याशी संबंधित निर्णयासह अनेक महत्वाच्या निर्णयांमध्ये न्यायमूर्ती सूर्यकांत यांचा सहभाग होता.
खरगे यांनी एक्स पोस्टमध्ये लिहिले आहे की,‘ न्यायाधीय सुर्यकांत यांना सरन्यायाधीश बनल्याबद्दल माझ्या शुभेच्छा. येणारे 14 महिने न्यायव्यवस्थेसाठी महत्वाचे आहेत. मला विश्वास आहे की, त्यांच्या नेतृत्वाखाली संववैधानिक मूल्ये आणि संस्थात्मक ताकद अधिक मजबूत होईल आणि प्रत्येक नागरिकाला न्यायाचा विश्वास मिळेल.

भारताचे 53 वे आणि नवे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायालय क्रमांक 1 मध्ये आपले काम सुरू केले आहे. न्यायालयाच्या कक्षात उपस्थित असलेल्या वकिलांनी नवीन सरन्यायाधीश, न्यायमूर्ती सूर्यकांत यांचे स्वागत केले आणि अभिनंदन केले, कारण त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अधिकृत कामकाज सुरू केले होते,न्यायमूर्ती जयमाल्य बागची आणि अतुल एस. चांदुरकर यांच्या खंडपीठावर होते.
हरियाणातील एका गावापासून ते भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदापर्यंत, न्यायमूर्ती सूर्यकांत यांचे जीवन न्यायाप्रती संघर्ष, समर्पण आणि सचोटीचे उदाहरण आहे. 10 फेब्रूवारी 1962 रोजी हरियाणातील हिसार जिल्ह्यातील पेटवार गावात जन्मलेल्या सूर्यकांत यांचे बालपण अत्यंत गरीब परिस्थितीत गेले. त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातील शाळेत पूर्ण केले आणि 1981 मध्ये हिसार येथील सरकारी पीजी कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. त्यानंतर 1984 मध्ये त्यांनी रोहतक येथील महर्षी दयानंद विद्यापीठातून कायद्याची पदवी (एलएलबी) पूर्ण केली. त्याच वर्षी त्यांनी हिसार येथील जिल्हा न्यायालयात वकिली सुरू केली आणि 1985 मध्ये त्यांनी चंदीगड येथील पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात वकिली सुरू केली.

7 जुलै 200 रोजी त्यांना हरियाणाचे महाधिवक्ता म्हणून नियुक्त करण्यात आले, ते या पदावर असलेले सर्वात तरुण व्यक्ती ठरले. पुढच्या वर्षी त्यांन वरिष्ठ वकिल म्हणून बढती देण्यात आली. 9 जानेवारी 2004 रोजी ते पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे कायमस्वरुपी न्यायाधीश झाले. नंतर,5 ऑक्टोबर 2018 रोजी त्यांना हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आले. 24 मे 2019 रोजी ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनले.



Comments