top of page

राष्ट्रवादी (श.प.) गटाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचा पती वाल्मिक कराडच्या रडारवर!परळीत ऑडिओ क्लिप व्हायरल, ‘ अण्णा बाहेर येतोय’

ree

बीड : नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या निकालाअगोदरच बीडमध्ये धमक्यांचे सत्र सुरू झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाच्य उमेदवार पद्मश्री धर्माधिकारी यांचे पती माजी नगाध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांनी एका कार्यकर्त्याजवळ काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार दीपक देशमुख वाल्मिक कराडच्या रडारवर असल्याचे बोलतानाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या ऑडिओक्लिपनंतर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.


बीडच्या परळी नगरपालिका निवडणुक मतदान झाल्यानंतर मतदान यंत्र ठेवलेल्या स्ट्राँग रूम बाहेर गोंधळ घातल्यावरूण दिपक देशमुख यांच्यासह पंधरा ते वीस जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यानंतर दिपक देशमुख यांनी परळीतील प्रशासन कोणाच्यातरी दबावाखाली काम करत असल्याचा आरोप केला.


दिपक देशमुख यांनी पत्रकार परिषदेत माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी आणि सुनील मस्के यांच्यात झालेल्या संभाषणाची क्लिप ऐकवत त्यांच्या जीवाला धोका असल्याचा दावा केला आहे. तुम्ही दिपक देशमुख यांच्यासोबत राहू नका, आण्णा लवकरच बाहेर येत असून ते साहेबांच्या रडारवर आहेत, त्यामुळे तुम्ही माझ्यासोबत राहा असे, या ऑडियो क्लिपमध्ये म्हटले आहे.


नगरपरिषद निवडणुकीनंतर मतदान यंत्र स्ट्रँग रूम मध्ये ठेवण्यात आले आहेत. त्या ठिकाणी आम्हाला 24 तास थांबण्यासाठी परवानगी द्या. गादी व पलंगासह प्रवेश द्या अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार संध्या देशमुख यांचे पती दिपक देशमुख व त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली होती. याच मागणीवरून त्यांनी स्ट्राँग रूम बाहेर जमाव एकत्र करत पोलिस अधिकार्‍यांशी वाद घातला होता. या प्रकरणात आता पोलिस अधिकार्‍यांच्या तक्रारीवरून दिपक देशमुख यांच्यासह 15 ते 20 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आमच्या जीवाला धोका असून बाजीराव धर्माधिकारी यांचा सीडीआर तपासण्यात यावा अशी मागणी दिपक देशमुख यांनी केली आहे.


स्ट्रँग रूम बाहेर थांबण्यासाठी रीतसर परवानगी मागितली होती परंतु ती दिली गेली नाही, आम्ही त्या ठिकाणी थांबलेलो असताना पोलिसांनी आम्हाला हाकलून लावले असे देखील देशमुख यांनी म्हटले असून या प्रकरणाविषयी आम्ही निवडणूक अयोगाकडे तक्रार दाखल केल्याचंही दिपक देशमुख म्हणाले.

Comments


bottom of page