राहुल गांधींचा ईव्हीएमवर हल्लाबोल, कर्नाटक सरकारचा ईव्हीएमविरोधात मोठा निर्णय
- Navnath Yewale
- Sep 6
- 2 min read

लोकसभेतील विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या मत चोरीवरून केंद्रीय निवडणूक आयोग आणि भापवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. यादरम्यान त्यांनी बिहार राज्यात रॅली काढत भाजपवर आरोप केले होते. तसेच पत्रकार परिषद घेत बंगळुरू सेट्रलची जागा भाजपने जिंकल्याचे पुरावे सादर करत बॉम्ब फोडला होता. तर आगामी काळात हायड्रोजन बॉम्ब फोडणार असल्याची घोषणा केली आहे. यादरम्यान आता कर्नाटकातील सिद्धरमय्या सरकारने मोठी घोषणा केली आहे. मुख्यमंत्री सिद्धरमय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी आगामी पंचायत आणि नागरी निवडणुकांबाबत मोठा निर्णय घेतल्याचे सांगितले. त्यांनी आगामी होणार्या स्थानिकच्या निवडणुकीत ईव्हीएमचा वापर होणार नाही अशी घोषणा करताना मतपत्रिकांचा वापर केला जाईल असे सांगितले. त्यांच्या या निर्णयामुळे खळबळ उडाली आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी बर्याच काळापासून निवडणुका, निवडणुक व्यवस्था, निवडणुक आयोगाच्या विरोधात आवाज उठवत आहेत. याची सुरुवातच ईव्हीएमविरोधात झाली असून व्हीव्हीपॅटवरुनही त्यांनी भाजपसह निवडणुक आयोगावर हल्लाबोल केला होता. तसेच मतदार यादीतील घोळही समोर आणला. त्यानंतर त्यांनी आता फक्त अनुबॉम्ब पडला आहे. पण यापेक्षा मोठा असणारा हायड्रोजन बॉम्ब येत आहे, तयार रहा असा इशाराच भाजपसह निवडणुक अयोगाला दिला आहे. सध्या देशभर याची चर्चा सुरू आहे.
दरम्यान, कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आगामी स्थानिकच्या निवडणुका ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकांंचा वापर करण्यात येणार आहे. आता ईव्हीएमने नव्हे तर मतपत्रिकेने निवडणुका होती अशी घोषणाच मुख्यमंत्री सिद्धरमय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी केली आहे.
याबाबत आता कर्नाटक सरकारने राज्य निवडणुक आयोगला शिफारस केली असून तसा प्रस्तावही मंत्रिमंडळाने मंजूर केल्याचे म्हटले आहे. यावेळी सरकारने पाठवलेल्या प्रस्तावात, ईव्हीएमवर जनतेचा विश्वास आणि विश्वासार्हतेचा अभाव आहे. जर निवडणुका मतपत्रिकेद्वारे घेतल्या गेल्या तर निवडणुकांमध्ये पारदर्शकता आणि निष्पक्षता वाढेल. मंत्रिमंडळाने राज्य निवडणुक आयोगाला निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्यास सांगितले आहे. मतपत्रिकेद्वारे निवडणुकांसाठी पुढील 15 दिवसांत नियम आणि आवश्यक कायेदशीर बदल केले जातील. पण जर ईव्हीएमद्वारे निवडणुका घ्याव्याच लागतील असे कोणत्याही नियमात असेल तर तो नियम बदलला जाईल.
देशभरात सध्या काँग्रेसने मत चोरीच्या मुद्यावरून रान उठवले असून निवडणुक आयोग आणि भाजपविरुद्ध तीव्र युद्ध छेडले आहे. या युद्धात काँग्रेस नेते राहुल गांधी अग्रभागी असून त्यांनी आता लढाई तीव्र केल्याचे दिसत आहे. तर कर्नाटक सरकारने मतपत्रिकेद्वारे निवडणुकांचा मास्टरस्ट्रोक खेळत राहुल गांधी यांच्या निवडणुक आयोगाविरुद्ध मोहिमेला बळकटी देण्यासाठी मास्टरस्ट्रोक खेळला आहे.
भाजपचा संताप
कर्नाटक सरकारने निर्णय जाहीर केल्यानंतर भाजपने यावर संताप व्यक्त केला आहे. मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्याविरुद्ध भाजप असून प्रदेश भाजप अध्यक्ष बीवाय विजयेंद्र यांनी निशाना साधला आहे. त्यांनी, काँग्रेसचा मतांची चोरी करण्याचा आणि मतपत्रिकेचा वापर करून निवडणुक गैरप्रकार करण्याचा इतिहास असल्याचे म्हटले आहे. इंदिरा गांधींनही तेच केले होते. आता जर काँग्रेस सरकार मतपत्रिकेद्वारे निवडणुकांकडे वाटचाल करण्याचा विचार करत असेल तर काँग्रेस जगाचा अपमान करत आहे कारण संपूर्ण जग तंत्रज्ञानाच्या दिशेने पुढे जात आहे, मात्र काँग्रेस मागे जाण्यात धन्यता मानत आहे.



Comments