लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई भारताच्या ताब्यात !
- Navnath Yewale
- 4 days ago
- 1 min read

नवी दिल्ली: कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीचा कुख्यात शूटर आणि धाकटा भाऊ अनमोल बिश्नोई वय ( 25) याला अट करून, अखेर अमेरिकेतून चार्टर्ड विमानाने भारतात आणण्यात आले. आत अनमोलला दिल्ली विमानतळावरून थेट पटियाला न्यायालयात उच्च सुरक्षेत हज केले जाणार असल्याची माहिती आहे. येथे एनआयए अनमोलची कोठडी मागणार आहे.
अनमोल हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचा ( दि.12 ऑक्टोबर 2024) मुख्य कट रचणारा आहे. त्याच्याविरुद्ध 31 गुन्हे दाखल आहेत, ज्यात सिद्धू मूसेवाला यांची हत्या (मे 2022) आणि सलमान खानच्या घरी गोळीबार (एप्रिल 2024) यांचा समावेश आहे. अनमोलवर एनआयए ने 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
अनमोल हा लॉरेन्स बिश्नोईचा धाकटा भाऊ आहे, जो 15 मे 2022 रोजी ‘ भानू’ नावाने बनावट पासपोर्ट वापरुन अमेरिकेत पळून गेला होता. नोव्हेंबर 2024 मध्ये, त्याला बनावट कागदपत्रांवर अमेरिकन इमिग्रेशनने अटक केली. त्याला जामिनावर सोडण्यात आले. परंतु मार्च 2025 मध्ये भारताच्या विनंतीवरून अमेरिकन परराष्ट्र विभागने प्रकरणाची माहिती मागितली. 6 डिसेंबर 2025 रोजी इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस (आरसीएन) जारी केली. अनमोलवर 31 गुन्हे दाखल आहेत. राजस्थानमध्ये 22 (खंडणी, खून) आणि 9 अटक वॉरंट एनआयए ने त्याला दोन प्रकरणांमध्ये आरोपी म्हणून घोषीत केले आहे. लॉरेन्स टोळीचे पंजाब, हरियाणा, राजस्थान, दिल्ली नेटवर्क चालवण्यात अनमोलने महत्वाची भूमिका बजावली होती.
दरम्यान, अनमोलचा मोठा भाऊ लॉरेन्स बिश्नोई वय (32) सध्या तुरुंगात आहे. 2023 मध्ये त्याला मनी लाँड्रिंग आणि मकोका प्रकरणात अटक करण्यात आली होती. लॉरेन्स-अनमोल जोडीने टोळी नियंत्रित केली. अनमोल खंडणी आणि गोळीबार व्यवस्थापित करत असे. अनमोलची अटक लॉरेन्ससाठी एक मोठा धक्का असणार आहे.



Comments