लोकसभेत प्रंचंड गदारोळ; अमित शहांच्या अटकेचा मुद्दा, विरोधकांनी विधेयक फाडून फेकले.
- Navnath Yewale
- Aug 20
- 1 min read

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी पंतप्रधानांसह मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पदावरून हटविण्याची तरतूद असलेली तीन विधेयके लोकसभेत सादर केली. या विधेयकांना सर्वच विरोधी पक्षांनी जोरदार विरोध केला. विरोधी खासदारांनी जोरदार घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला. याचदरम्यान विरोधी बाकांवर शहांच्या अटकेचा जुना मुद्दा उकरून काढण्यात आला. त्याला शहांनी ताबडतोब प्रत्युत्तर दिले.
विरोधकांनी तीव्र विरोध करताना विधेयकांच्या प्रतीही फाडल्या. त्याचे तुकडे अमित शहांच्या दिशेने फेकण्यात आले. यावेळी अमित शाह यांच्याकडून विधेयकांबाबत भाष्य केले जात होते. विरोधी खासदारांनी सभागृहातील मोकळ्या जागेत येत मोठा गदारोळ करण्यास सुरुवात केल्यानंतर अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहाचे कामकाज तीन वाजे पर्यंत स्थगित केले.
अमित शहरांनी दुपारी देान वाजीता लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर केंद्रशासित प्रदेश सरकार ( सुधारणा) विधेयक, संविधान ( 130 वी सुधारणा) विधेयक आणि जम्मू -काश्मीर पुनर्गठन (सुधारणा) विधेयक ही तीन विधेयके सादर केली. त्याला विरोधकांनी जोरदार विरोध केला.
असुद्दीन ओवेसी, मनिष तिवारी, के.सी. वेणुगोपाल यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत ही बिले परत घेण्याची मागणी केली. वेणुगोपाला यांनी विरोध करताना थेट अमित शहांच्या अटकेचा मुद्दा काढला. गुजरातचे गृहमंत्री असताना त्यांना अटक झाली त्यावेळी नैतिकता दाखवत त्यांनी राजीनामा दिला होता का, असा सवाल त्यांनी केला.
वेणुगोपाल यांच्या या विधानाला शहांनी लगेच प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, माझ्याविरोधात खोटे आरोप करण्यात आले होते. नैतिकतेच्या आधारावर मी लगेच राजीनामा दिला होता. न्यायालयाकडून आरोप खोटे सिद्ध होईपर्यंत कोणतेही संविधानिक पद स्वीकारले नव्हते. असे शहांनी म्हटले. शहांनी यादरम्यान ही विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवली जाणार असल्याचेही सांगितले. मात्र, विरोधकांचा गदारोळ कमी झाला नाही. काही खासदारांनी विधेयकांच्या प्रती फाडून त्याचे तुकडे शहांच्या दिशेने फेकले. त्यामुळे कामकाज स्थगित करावे लागले.


Comments