वर्क फ्रॉम होम सोबत आता शाळांनी काही काळासाठी ऑनलाइन क्लासेसची सोय करावी- पंतप्रधान मोदी
- Navnath Yewale
- 18 hours ago
- 1 min read

पश्चिम आशियात निर्माण झालेल्या युद्धाच्या परिस्थितीमुळे अनेक देशांवर इंधन संकट कोसळलं आहे. भारतावरदेखील त्याचे परिणाम दिसून येऊ लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीचा सल्ला देशातील नागरिकांना दिला आहे. शिवाय पुढील वर्षभर सोनं खरेदी करू नये, असंही त्यांनी रविवारी म्हटलं होतं. त्यातच आता शाळांना ऑनलाईन क्लासेस घेण्याचं आवाहन पंतप्रधानांनी गुजरातमधून केलं आहे.
सोमवारी रात्री अयोजीत कार्यक्रमामध्ये बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये परदेशात जाण्याऐवजी आपल्याच देशातील चांगल्या स्थळांना भेटी द्या.. परदेशात डेस्टिनेशन वेडिंगचं फॅशन वाढत आहे. यावर मोठ्या प्रमाणावर विदेशी चलन खर्च होतं. भारतात अशी जागा नाही का, जिथे आपण सुट्ट्या घालवू शकू किंवा लग्नासारखे समारंभ साजरे करू. लग्नासाठी भारतापेक्षा दुसरी पवित्र जागा असू शकत नाही. या मातीत लग्न केली तर पूर्वजांचे आशीर्वाद आपल्याला मिळतील.
मोदी पुढे म्हणाले,परदेशात राहणार्या आपल्या संपर्कातील लोकांना भारतात बोलवा. एका ट्रिपसाठी तरी आपल्या जवळच्या लोकांना बोलवा. परदेशात राहणार्या भारतीयांनी कमीत कमी पाच जणांना भारतात आणावं, तेव्हाच देश पुढे जाईल. सध्याच्या संकटामुळे आपल्या देशाच्या विकासाला खिळ बसू नये, यासाठी आपण सर्वांना मिळून प्रयत्न करु. याशिवाय मोदींना शाळांना आवाहन करत ऑनलाइन क्लासेस घेण्याचा सल्ला दिला आहे. इंधन बचतीसाठी आवश्यक असलेली सर्व पावले केंद्र सरकार उचलत आहे. लोकांनी प्रवासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा, वर्क फ्रॉर्म होमला प्राधान्य द्यावं.. याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी गुजरामधून केला.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, “ जिथे शक्य असेल तिथे पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, मेट्रो, इलेक्ट्रिक बस आणि पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करा, ज्यांच्याकडे कार आहे त्यांनी एका गाडीत जास्त लोकांना सोबत घेऊन जा.. ज्यांच्याकडे ईव्ही आहे त्यांनी दुसर्यांना मदत करावी. डिजिटल टेक्नॉलॉजीने सर्वकाही सोपं केलं आहे. सरकारी आणि खासगी कार्यालयांमध्ये व्हर्च्युअली मीटिंग आणि वर्क फ्रॉम होमला प्राधान्य दिलं पाहिजे. मी शाळांनाही आवाहन करतो..शाळांनी काही काळासाठी ऑनलाइन क्लासेसची सोय करावी, असं प्रतिपादन पंतप्रधानांनी केलं.



Comments