वादावादी करून पक्षाच्या बाहेर पडलो नाही, भाजपला टक्कर कोणी देऊ शकतो तर काँग्रेसच आहे; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका

मुंबई: अजित पवारांच्या राष्ट्रवादीला काँग्रेससोबत आघाडीला विरोध करत पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप राष्ट्रवदी काँग्रेस (शदरचंद्र पवार) पक्षातून बाहेर पडले. शरद पवारांची साथ सोडल्यानंतर प्रशांत जगताप यांना काही पक्षातून ऑफर आल्या. मात्र, त्यांनी काँग्रेसमध्ये आज प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत प्रवेश केल्यानंतर जगताप यांनी भूूमिका मांडली.
मुंबईतील टिळक भवनामध्ये प्रशांत जगताप यांचा पक्षप्रवेश झाला. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकार, विजय वडेट्टीवार यांच्यासह काँग्रेसचे नेते यावेळी उपस्थित होते.
यावेळी प्रशांत जगताप म्हणाले की, “ काँग्रेस पक्षाचा 135 वर्षाचा प्रवास आहे. पूर्वाश्रमीचा पक्ष सोडून इथे दाखल होत आहे. आधीच्या पक्षातील नेत्यांचे आभार मानतो. काही वादावादी करून बाहेर पडलो नाही, गांधी नेहरू आणि शिव-शाहू- आंबेडकर यांचे विचार पुढे नेण्यासाठी इथे प्रवेश केला आहे”
“ माझी लढाई भाजप विरोधी, संघ विरोधी आणि दहशतवाद निर्माण करणार्याच्या विरोधात आहे. गुन्हेगारीत पहिला नंबर पुण्याचा. भ्रष्टाचारात महाराष्ट्र पहिला आणि पुणे पहिले आहे. भाजपाच्या ताब्यात पुणे आहे ” अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
दरम्यान, “ 26 वषे मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतो. मी कधीही माध्यमांना काही सांगितलं नाही. आतादेखील मी तेच करेन.पक्षाबरोबर कायम राहून मी काम करेन. भाजपाला कोणी टक्कर देऊ शकतो, तर तो काँग्रेस पक्षच आहे. आता राजकारण बंद करेन, पण काँग्रेसमधून जाणार नाही. कोणाबद्दल दुजाभाव नाही, कोणशी वैरही नाही. अशा भावना प्रशांत जगताप यांनी व्यक्त केल्या.



Comments