विरोधकांची अवस्था म्हणजे सहन ही होत नाही, अन् सांगता ही येत नाही - मुख्यमंत्री फडणवीस
- Navnath Yewale
- Aug 11
- 2 min read

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मत चोरी चा आरोप करत दिल्लीमध्ये पत्रकार परिषदेत कर्नाटक राज्यातील एका विधानसभा क्षेत्राच्या मतदारयादीचे प्रेझेंटेशन केले. देशभरात मत चोरी चा आरोप करत आज इंडिया आघाडीच्या वतिने दिल्लीमध्ये संसदभवना पासून निवडणूक आयोगाच्या मुख्यालया पर्यंत मोर्चा काढण्यात आला. यामध्ये इंडिया आघाडीचे 300 खासदार सहभागी झाल्याचा दावा करण्यात आला. परवानगी नसल्याने पोलिसांनी राहुल गांधी, प्रियंका गांधी वाड्रा, संजय राऊत यांच्यासह अनेक खासदारांना ताब्यात घेतले.
यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाना साधला माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या लोकांचा भारतीय संविधान आणि भारतीय न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्या संविधानाने जो निवडणूक आयोग तयार केला आहे त्या निवडणूक आयोगाने चार पत्र यांना दिले, की तुम्ही जे सांगता ते येऊन इथ शपथेवर सांगा. यांची हिमंत नाही का जात नाहीत हे तिथे, का पुरावे देत नाहीत. रोज खोटं बोलायंच आणि पळून जायचं पळपुटे लोक आहेत.
यांच्याजवळ काहीच नाही, आपला रोजचा परभव होतोय तो पराभव पचवता येत नाही. सहन होत नाही अन् सांगता येत नाही अशी यांची अवस्था आहे. म्हणूने असं वागत आहेत. आम्ही लोकांच्या प्रेमाची चोरी करतो, लोकांच्या मनाची चोरी करतो म्हणून लोक आम्हाला मतदान करतात. त्यांनी जनादेशाची चोरी केली होती ते जनादेश चोर आहेत, म्हणून लोकांनी त्यांना घरी बसवलं. त्यामुळे जनादेश चोरांनी लोकशाहीमध्ये कसंवागायचं आम्हाला शिकवावं यापेक्षा काय दुर्दैव आहे. ते जनादेश चोर आहेत आणि त्यांचे चेले चपाटे कफन चोर आहेत. ज्यांनी मुंबई महापालिकेमध्ये कोविड घोटाळ्यात कफन खरेदीमध्ये चोरी केली. त्यातही पैसा कमवला आता कोणाचे सरदार म्हणायचं. त्यांना कफन चोरांचे सरदार म्हणू मला अशी भाषा वापरायला आवडत नाही असंही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
इंडिया आघाडीच्या महाजनआक्रोश मोर्चावर बोलताना फडणवीस म्हणाले की, हा त्यांचा मनआक्रोश आहे जनतेला काही घेणं देनं नाही, त्यामुळे जनआक्रोश नाही. सत्ता गेली, खुर्ची गेली त्यामुळे मन मानत नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला.


Comments