top of page

शरद पवारांची प्रकृती बिघडली; बारामतीहून पुण्याला हलवले रुबी हॉल रुग्णालयात उपचार सुरू

बारामती: खासदार शरद पवार यांची प्रकृती बिघाडली आहे. शरद पवार यांना बारामतीहून कार्डियाक अ‍ॅब्यूलन्सने पुण्यात आणले आहे. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांची प्रकृती बरी नसल्याचे सांगितले जात होते. आत मात्र त्यांना जास्त त्रास होवू लागला. त्यांना ताप, खोकला आणि कफ असल्याचे सांगण्यात आले आहे. शरद पवार यांच्या कार्यालयाने तशी माहिती दिली आहे. आज बारामती तालुक्यातील काठेवाडी येथे दिवंगत नेते अजित पवार यांच्या तेराव्याचा विधी पार पडतो आहे. या विधीला शरद पवार तसेच त्यांचे इतर कुटुंबीय उपस्थित राहणार होते. परंतु आज सकाळपासूनच शरद पवार यांना त्रास होत होता.

शरद पवार यांना ताप खोकला. शरद पवार यांना सकाळपासूनच खोकला, ताप, सर्दीचा त्रास जाणवत असल्याने सकाळीच डॉक्टरांची एक टीम शरद पवार यांच्या बारामतीतील गोविंदबाग या निवासस्थानी दाखल झाली होती. डॉक्टरांनी शरद पवार यांची नियमित तपासणी केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा दुपारी डॉक्टरांची एक टीम शरद पवार यांची तपासणी करण्यासाठी गेले होत. त्यानंतर त्यांना पुण्याला हलवलण्यात आले.


रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार : शरद पवार यांना कार्डियाक अ‍ॅब्यूलन्सने बारामतीहून पुण्याकडे हलवण्यात आले आहे. पुण्यातील प्रसिद्ध रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Comments


bottom of page