शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकार्याचा भिमाशंकर मंदिरात राडा; पूजार्याला मारहाण
- Navnath Yewale
- Jan 2
- 1 min read

पुणे : बारा ज्योतिर्लिंगापैकी एक अयलेल्शस भिमाशंकर मंदिरात जबर माहरणीचा प्रकार घडला आहे. शिवसेना (शिंदे ) गटाच्या पुणे जिल्हाध्यक्षाने थेट पूजार्याला मारहाण केल्याने मंदिर प्रशासनाने संताप व्यक्त केला आहे. शिंदे गटाचे पुणे उत्तर जिल्हाप्रमुख देवदास दरेकर यांनी पुजार्याला मारहाण केली. योगेश शिर्के असे या पुजार्याचे नाव असून अद्यापतरी कुठलीही पोलिस तक्रार दाखल करण्यात आली नाही. ही संपूर्ण घटना मंदिरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
शिंदेगटाचे जिल्हाप्रमुख देविदास दरेकर यांनी पुजार्याला मारहाण केली यावेळी भीमाशंकर मंदिराच्या मुख्य गाभार्यात भक्तांचा अभिषेक सुरू होता. याचवेळी दरेकर आणि त्यांचे सहकारी दर्शनासाठी मंदिरात दाखल झाले. गाभार्यात प्रवेश करत ते अभिषेक करणार्या भक्तांच्या मागे उभे राहिले. मंदिर गाभार्यात गर्दी होत असल्याने त्यावेळी मंदिरात पुजारी असलेल्या योगेश शिर्के यांनी दरेकर यांना दर्शन घेऊन बाहेर जाण्याची वनिंती केली त्यावेळी दरेकर यांनी देखील शिवलिंगाची पूजा करण्याची इच्छा व्यक्त केली. यावरून दरेकर आणि शिर्केे यांच्यात शाब्दीक बाचाबाची झाली. यावेळी इतर पुजार्यांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला. या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.



Comments