सी.पी राधाकृष्णन भारताचे नवे उपराष्ट्रपती
- Navnath Yewale
- Sep 9
- 1 min read

उपराष्ट्रपती निवडणूक आज मंगळवारी संपन्न झाली. या निवडणुकीसाठी एनडीएकडून सी.पी.राधाकृष्णन मैदानात उतरले होते. तर इंडिया आघाडीकडून बी सुदर्शन रेड्डी मैदानात होते. या निवडणूकीत 100 हून अधिक मतांनी सी.पी. राधाकृष्णन यांचा विजय झाला. त्यामुळे सी.पी.राधाकृष्ण भारताचे नवे राष्ट्रपती ठरली आहेत. नवे उपराष्ट्रपती कोट्यवधी रुपयांचे मालक आहेत.
उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीतील दोन्ही प्रमुख उमेदवार दक्षिण भारतातील होते. आता नव्याने होणारे उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन तामिळनाडूचे आहेत. सी.पी. राधाकृष्णन महाराष्ट्राचे राज्यपाल होते. एनडीएकडून ते उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उतरले होते.
लोकसभा निवडणूक 2019 मधील माहितीनुसार, सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे एकूण 67,11,40,166 रुपयांची संपत्ती आहे. त्यांच्याजवळ जंगम मालमत्ता 7,31,07,436 रुपये इतकी आहे. त्यात बँकेतील रक्कम, इन्शुरन्स, बॉन्ड, शेअर आणि दागिन्यांचाही समावेश आहे.



Comments