top of page

सुनित्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपद हिच ‘दादांना’ खरी श्रद्धांजली सामान्यांच्या भावना, मुख्यमंत्र्यांच्या वर्षानिवास्थानी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची खलबते; उद्याच नव्या उपमुख्यमंत्र्याचा शपथविधी

मुंबई: अजित दादांच्या दुर्दैवी निधनानंतर काल त्यांच्या पार्थिवार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. आज त्यांच्या अस्थिवित्सर्जन होत असतानाच उपमुख्यमंत्री पदावरुन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षानिवास्थानी भेट घेतली. मुख्यमंत्र्याच्या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधत ‘सर्वांचे एकमत झाले तर सुनित्रा पवार उद्याच उपमुख्यमंत्री होतील’ अशा प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिल्या. दादांचा वारसा चालण्यास सक्षम असलेल्या सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपद देणंं हिच खरी दादांना श्रद्धांजली ठरेल अशा भावना राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहेत.


राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी (दि.28 जानेवारी) बारामती येथे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. काल त्यांच्या पार्थिवार शासकीय इतमामात अंत्यसंस्कारा नंतर आज शुक्रवारी (दि.30 जानेवारी) एकीकडे त्यांच्या अस्थिवित्सर्जन होत असतानाच उपमुख्यमंत्रीपदावरुन राष्ट्रवादीतील प्रमुख नेत्यांंची मुख्यमंत्र्यासमवेत वर्षाबंगल्यावर खलबते सुरू झाली आहेत. दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकां दोन्ही राष्ट्रवादीने एकत्रित लढल्या.


त्यानंतर होवू घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांही दोन्ही राष्ट्रवादीकडून एकत्रित लढवल्या जात आहेत. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचे संकेत अजित पवार यांनी दिले होते. शिवाय, महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अजित पवार यांनी सत्ताधारी भाजपचा घटकपक्ष असताना, स्वत:सत्तेत सहभागी असताना भाजपवर आरोप केले होते.


जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर प्रचारासाठी बुधवारी दि.28 जानेवारी सकाळी 8:15 च्या सुमारास अजित पवार खासगी विमानाने मुंबईहून बारामतीच्या दिशेने निघाले. बारामतीच्या विमानतळावर लँडिंगदरम्यान विमानाला भीषण अपघात झाला यामध्ये अजित पवार यांच्यासह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. देशभरातील मातब्बरांसह पदाधिकारी, अधिकारी, लाखों चाहते कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत गुरूवारी (दि.29 जानेवारी) बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान मैदानावर शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


अंत्यसंस्कारा नंतर मंत्री नरहरी झिरवळ यांनी माध्यमांशी बोलताना सुनेत्रा पवार यांनाच उपमुख्यमंत्रीपद द्यावे अशी भावना व्यक्त केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. पवार कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतल्याचे प्रफुल्ल पटेल म्हणाले. मात्र, अजित दादा नंतर उपमुख्यमंत्रीपदाचे काय? या प्रश्नावरच ही भेट असल्याचे बोलले जात होते. त्यास राष्ट्रवादच्या प्रमुख नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने दुजोरा मिळाला आहे.


अजित पवार यांच्या अस्थिवित्सर्जनाचा कार्यक्रम एकीकडे सुरू असतानाच दूसरीकडे राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदा बाबत राष्ट्रवादीचे प्रमुख नेते ज्यामध्ये प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे, छगन भुजबळ यांनी वर्षानिवास्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर मंत्री छगन भुजबळ यांनी सर्वांचे एकमत झाले तर सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर, प्रफुल्ल पटेल म्हणाले की, पवार कुटुंबासह पक्षावर दुख:चा डोंगर कोसळला आहे. अद्याप विधीकार्य सुरू असून, आणखी दोन तीन दिवस थांबावे लागेल. निश्चितच पक्षाकडे असलेली पदे, जबादार्‍या त्या सांभाळाव्या लागतील जरा थांबा होईल काय ते दोन तीन दिवसांत अशा शब्दात प्रतिक्रिया दिल्या आहेत.


त्याचबरोबर काँग्रेसचे नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनीही सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री झाल्या, आम्हाला पहिल्यांदाच राज्याच्या उमपुख्यमंत्री पदावर महिला पहायला मिळेल आणि याचा आनंदच आहे असे म्हणत सम्मती दर्शवली. अजित दादांचा वारसा सक्षमपणे चालवण्यासाठी सुनेत्रा पवार यांनाच उपमुख्यमंत्रीपद मिळावे हिच दादांना खरी श्रद्धांजली असेल अशा भावना राष्ट्रवादीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहेत.

सुनेत्रा पवार या राज्यसभेवर खासदार आहेत, त्यातच त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची जाबाबदारी अजित दादांचा वारसा चालण्यास सक्षम असलेल्या सुनित्रा पवार यांनाच उपमुख्यमंत्रीपद देण्यात यावे हिच खरी दादांना श्रद्धांजली ठरेल अशा भावना राष्ट्रवादीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहेत.

Comments


bottom of page