सोनम वांगचुक यांचे 18 व्या दिवशीही उपोषण सुरूच, दोन दिवसात जीवाला धोक्याची शक्यता! दिल्ली हायकोर्टाने दिले केंद्र,आणि दिल्ली सरकारला उत्तर देण्याचे निर्देश

नवी दिल्ली: गेल्या 17 दिवसांपासून जंतरमंतरवर उपोषण करत असलेल्या पर्यावरण कार्यकर्ते आणि शिक्षण सुधारक सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावत चालली आहे. या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारला नोटिस धाडली आहे. दोन्ही सरकारांना उत्तर देण्यासाठी बुधवारपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
सोनम वांगचुक यांचं बेमुदत उपोषण सुरू आहे. त्यांची प्रकृती दिवसागणिक खालावत चालली आहे. त्यांचं वजन 8 किलोनं घटलं आहे. त्यामुळे या प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. सोनम वांगचुक यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात यावं आणि त्यांचा जीव वाचवण्यासाठी तातडीनं आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशा मागण्या जनहित याचिकेतून करण्यात आल्या आहेत. गरज भागसल्यास त्यांना जबरदस्तीनं द्रव आहार, व्हिटामिन आणि अन्य आवश्यक पोषक घटक द्यावेत, अशीही मागणी याचिकेतून करण्यात आलेली आहे.
सामाजिक कार्यकर्ते आणि वकील राकेश कुमार सैनी यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, ‘बेमुदत उपोषणामुळे वांगचुक यांची प्रकृती वेगानं खालावत आहे. योग्य वेळी त्यांना उपचार न मिळाल्यास त्यांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. दोन दिवसांत त्यांचा रक्तदाब 109/70 वर पोहोचला आहे. त्यांच्यासोबत काही अघटित घडल्यास ते देश आणि जगासाठी लाजीरवाणं आणि दुर्दैवी असेल, ‘ असं सैनी यांनी याचिकेत नमूद केलं आहे.
थ्री इंडियट चित्रपटात आमर खानने ज्यांची भूमिका साकारली ते सोनम वांगचुक थ्री इडियट चित्रपटाच्या माध्यमातून देशाच्या घराघरात पोहोचले आहेत. तरा रॅमन मॅगसेसे पुरस्कार पटकावल्याने त्यांचं कार्य देखील देशाला परिचीत आहे. सोनम वांगचूक 28 जून पासून जंतरमंतरवर उपोषण करत आहेत. कॉकरोच जनता पार्टीच्या बॅनरखाली त्यांचं उपोषण सुरू आहे. नीट -यूजी पेपरफूटी प्रकरणात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, शिक्षण व्यवस्थेत सुधारणा व्हाव्यात, पेपरफुटीचा फटका बसलेल्या कुटुंबांना न्याय मिळावा यामागण्यांसाठी वांगचुक उपोषण करत आहेत.
दरम्यान, सोनम वांगचूक यांच्या प्रकृतीची चिंता व्यक्त करत ठाकरेंच्या शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठारेंनीही सोनम वांगचूक यांना फोन करून उपोषण मागे घेण्याची विनंती केली. तसेच, अनेकांकडून वांगचूक यांच्या प्रकृतीची काळजी व्यक्त करत उपोषण मागे घेण्याची विनंती केली जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून वांगचुक यांची प्रकृती बिघडत चालली आहे. अशक्तपणा वाढला आहे. त्यांचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टर सातत्यानं लक्ष ठेवून आहेत. आता या प्रकरणात सगळ्यांच्या नजरा दिल्ली उच्च न्यायालयाच्यवा पुढील सुनावणीकडे लागल्या आहेत. केंद्र आणि दिल्ली सरकारला बुधवारपर्यंत त्यांची बाजू मांडायची आहे. त्यानंतर न्यायालय पुढील निर्णय घेईल.



Comments