हा त्यांचाच डेटा, मी शपथपत्रावर का सही करू - राहुल गांधी
- Navnath Yewale
- Aug 11
- 1 min read

नवी दिल्ली: मत चोरी विरोधात आज इंडिया आघाडीच्या वतिने नवीदिल्लीत संसद भवनापासून निवडणूक अयोगाच्या मुख्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चास परवानगी नसल्याने पोलिसांनी इंडिया आघाडीचा मोर्चा आडवून राहुल गांधी, प्रियंका गांधी, अखिलेश यादव, संजय राऊत यांच्यासह इतर खासदारांना तब्यात घेतले. त्यानंतर सायंकाळी सर्व आंदोलकांना सोडून देण्यात आले. यावेळी राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकवर पलटवार केला.
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी कर्नाटक मधील बंगळुरु लोकसभा क्षेत्रातील महादवपूर विधानसभा क्षेत्राची मतदार यादी जाहिर करत पत्रकार परिषदेत मतचोरीचा दावा केला. त्यानंतर इंडिया आघाडीकडून निवडणूक अयोगावर जोरदार हल्लाबोल करत आज आंदोलनाची हाक देण्यात आली होती.
सकाळी 11:00 वाजता राहुल गांधी यांच्या नेतृत्वात पासून इंडिया आघाडीच्या जवळपास 300 खासदारांच्या सहभागामध्ये संसद भवनापासून मोर्चाला सुरुवात झाली. यामध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लकार्जुन खरगे, खासदार प्रियंका गांधी, खासदार संजय राऊत, अखिलेश यादव, प्रणिती शिंदे यांच्यासह इंडिया आघाडीचे खासदार सहभागी होते.
मोर्चास परवानगी नसल्याने दिल्ली पोलिसांनी बॅरिकेट लावून मोर्चा आडवला. मात्र, अखिलेश यादव यांनी बॅरिकेटवर चढून आत प्रवेश केला. यावेळी अखिलेश यादव यांनी निवडणूक अयोगावर आरोप केले. प्रतिबंधात्मक कारवाईनंतर सर्व आंदोलकांना सोडून देण्यात आले.
निवडणूक अयोगाने राहुल गांधी यांना नोटीसीद्वारे मतचोरीच्या आरोपा बाबत शपथपत्र देण्याची सूचना दिली होती. त्याचबरोबर राहुल गांधी यांनी कर्नाटक बरोबर महाराष्ट्रातही मतचोरीचा दावा केला होता. त्यानुसार कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना 10 दिवसात शपथपत्र सादर करण्याची नोटीस बाजावली आहे.
दरम्यान, राहुल गांधी यांनी सायंकाळी उशीरा माध्यमांशी संवाद साधत निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला. राहुल गांधी म्हणाले की, मी जाहिर केलेल्या मतदार याद्या निवडणूक अयोगाच्या वेबसाईटवरूनच प्राप्त केल्या आहेत. हा डेटा निवडणूक आयोगाचाच आहे. तो त्यांनी त्यांच्या वेबसाईटवरील याद्यांशी कनेक्ट करून पहावा. जर डेटाच निवडणूक अयोगाचा असेल तर मी शपथपत्र का देऊ असा सवाल करत राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर निशाना साधला.


Comments