top of page

होर्मुझमध्ये अमेरिकेकडून इरणाच्या जहाजावर गोळीबार! चीनचा सहभाग उघड; इराणकडून तीव्र शब्दात निषेध

अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चा यशस्वी व्हावी आणि युद्धाला पूर्णविराम मिळावा यासाठी संपूर्ण जग प्रार्थना करत आहे. पाकिस्तान या चर्चेसाठी सातत्याने पुढाकर घेत असून, अमेरिका आणि इराणमध्ये शांततेवर एकमत व्हावं यासाठी उतावीळपणे पुढाकार घेत आहे. पण एकीकडे दोन्ही देशांमध्ये चर्चा होत असताना, दुसरीकडे मात्र नाकाबंदीमुळे तणाव कमी होण्याचं नाव घेताना दिसत नाही आहे. त्यातच इराणचं एक जहाज सध्या अमेरिकेच्या ताब्यात आहे. इराणने चर्चा करण्याआधी आपल्या क्रू मेम्बरला सोडवं अशी मागणी केली आहे. दरम्यान अमेरिका मात्र चर्चेनंतर यासंदर्भातील निर्णय घेऊ असं सांगत आहे.


अमेरिकेने जहाज ताब्यात घेतल्याने दोन्ही देशांमध्ये निर्माण झाला आहे. त्यातच आता इराणी जहाजाच्या आत ठेवण्यात आलेल्या सामानासंदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारतीय- अमेरिकन रिपब्लिकन नेत्या आणि संयुक्त राष्ट्रांमधील अमेरिकेच्या माजी राजदूत निक्की हेली यांनी गेल्या आठवड्याच्या अखेरीस ‘ होर्मुझच्या सामुद्रधुनी’ क्षेत्रात अमेरिकेने जप्त केलेले जहाज क्षेपणास्त्रांचे सुटे भाग वाहून नेत होते असा दावा केला आहे.


निक्की हेली यांनी दावा केला आहे की, हे जाहज चीनवरुन निघालं होतं आणि इराणला जात होतं. यामध्ये मिसाइल्स तयार करण्यासाठी वापरलं जाणारं केमिकल होतं. ही रासायनिक मालवाहतूक अत्यंत धोकादायक आहे. या जहाजाने अमेरिकन लष्कराच्या इशार्‍यांकडे दूर्लक्ष केलं. अमेरिकन नौदलाने सुमारे सहा तास या जहाजाचा पाठलाग केला आणि त्यानंतर अखेर गोळीबार करून जहाजाचा ताबा घेतला.


निक्की हेली यांनी चीन इराणची सत्ता अधिक पॉवरफूल करण्यासाठी सातत्याने मदत करत असल्याचं यातून सिद्ध होत असल्याची टीका केली आहे. हे एक असं सत्य आहे ज्याकडे दुर्लक्ष केलं जाऊ शकत नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. या कंटेनर्समध्ये अशा वस्तू होत्या, ज्यांचा वापर नागरी आणि लष्करी अशा दोन्ही उद्देशांसाठी केला जाऊ शकतो. अमेरिकेच्या तपासातून असे उघड झाले आहे की,या मालवाहतुकीमध्ये काही विशिष्ट धातू, पाईप्स आणि इलेक्ट्रॉनिक घटक़ समाविष्ट होते, ज्यांचा वापर शस्त्रास्त्रनिर्मितीमध्ये केला जाऊ शकतो.


दरम्यान, हे जहाज एका चिनी बंदरातून येत होते आणि इराणच्या दिशेने जाण्यापूर्वी मलेशियाजवळ थांबले होते. तोस्का असं नाव असलेलं हे जहाज इराणच्या मालकीचे असून, शस्त्रस्त्रांशी संबंधित साहित्याची वाहतूक केल्यामुळे ते यापूर्वीच अमेरिकेच्या निर्बंधाच्या कक्षेत आलेले आहे. वारंवार चेतावणी देऊनही जेव्हा हे जाहज थांबलं नाही, तेव्हा अमेरिकेने गोळीबार केला. ज्यामुळे जहाजाच्या इंजिनचं नुकसान झालं. त्यानंतर अमेरिकन मरिन्सनी जहाजावर चढून त्याचा ताबा घेतला. इराणने जाहज जप्त केल्याने तीव्र शब्दांत निषेध केला आहे.

Comments


bottom of page